Sangli Samachar

The Janshakti News

महाराष्ट्रात धडाडणार योगींची तोफ !सांगली समाचार - दि. ८ एप्रिल २०२४
मुंबई  - सध्या राज्यात लोकसभा निवडणुकांच्या प्रचाराचा धुरळा उडाला आहे. भाजपने या सर्वात आघाडी घेऊन थेट केंद्रीय मंत्रीमंडळ, विविध राज्याचे मुख्यमंत्री, मंत्री आणि दिग्गज नेते मैदानात उतरवले आहेत. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या महाराष्ट्रात एकाच दिवशी तीन सभा होणार आहेत. भंडारा गोंदिया लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार खासदार सुनील मेंढे यांच्या निवडणूक प्रचारासाठी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या जाहीर सभेचे आयोजन उद्या 8 एप्रिल रोजी दुपारी 5 वाजता भंडारा येथे करण्यात आले आहे.

हिंदुत्वाचा कट्टर चेहरा आणि राष्ट्रवादी नेतृत्व म्हणून ओळख असलेले उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना भाजप महाराष्ट्राच्या मैदानात आणत आहे. लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने 8 एप्रिल रोजी शहरातील दसरा मैदानावर त्यांची जाहीर सभा होणार आहे. यावेळी महायुतीतील अनेक नेते मंडळीसह उमेदवार सुनील मेंढे उपस्थित असतील. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना ऐकण्यासाठी जाहीर सभेला नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे भारतीय जनता पार्टी भंडारा गोंदिया जिल्ह्याच्या वतीने करण्यात आले आहे.


महाराष्ट्रात एकाच दिवशी तीन सभा

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या राज्यात एकाच दिवशी 3 सभा होणार आहेत. वर्धा, भंडारा व नागपूरमध्ये योगी आदित्यनाथ जाहीर सभा घेणार आहेत. एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदींची सभा होत असताना दुसरीकडे योगी आदित्यनाथ सभा घेणार आहेत.