Sangli Samachar

The Janshakti News

काय भाव होता राव हे काय अपक्ष उमेदवारांना ? एक नजर इतिहासाच्या पानावर !



सांगली समाचार - दि. ८ एप्रिल २०२४
नवी दिल्ली - लोकसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं आहे. सर्वच राजकीय पक्षांनी आपली मोर्चेबांधणी केली असून जास्तीत जास्त जागा जिंकण्यासाठी प्रयत्न करत आहेत.  विविध राजकीय पक्षांच्या उमेदवारांसोबतच अपक्ष उमेदवार सुद्धा निवडणुकीच्या रिंगणात उतरतात. एक काळ असा होता की, भारतीय राजकारणात अपक्ष उमेदवारांचा काही ठराविक क्षेत्रात दबदबा पहायला मिळत होता. मात्र, हळूहळू अपक्ष उमेदवारांची ताकद कमी होत गेल्याचं पहायला मिळत आहे. जाणून घेऊयात आतापर्यंतच्या लोकसभा निवडणुकीत किती अपक्ष उमेदवारांनी निवडणूक लढवल्या आणि त्यापैकी किती उमेदवारांनी विजय मिळवला.

पहिली लोकसभा निवडणूक

1951-1952 मध्ये झालेल्या पहिल्या लोकसभा निवडणुकीत 37 अपक्ष उमेदवारांनी विजय मिळवला होता.

1957 ची लोकसभा निवडणूक

1957 मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत एकूण 1519 अपक्ष उमेदवारांनी निवडणूक लढवली होती. त्यापैकी 42 उमेदवारांना विजय मिळवण्यात यश मिळाले होते.

1962 च्या लोकसभा निवडणुकीत अपक्षांच्या संख्येत घट झाली. केवळ 20 अपक्ष उमेदवारांना यश मिळवण्यात यश आले. 

1980 मध्ये 12 अपक्ष उमेदवारांना निवडणुकीत विजय मिळवण्यात यश मिळाले.

इंदिरा गांधी यांच्या निधनानंतर 1984 मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत 5 अपक्ष उमेदवारांना विजय मिळवता आला.

1989 च्या लोकसभा निवडणुकीत 12 अपक्ष उमेदवारांनी विजय मिळवला.

अपक्ष उमेदवारांचा दबदबा कमी होऊ लागला

1991 नंतर भारतीय राजकारणात अपक्ष उमेदवारांचा दबदबा कमी होत असल्याचं दिसून आलं. अपक्ष उमेदवारांवरील जनतेचा विश्वास कमी झाल्याने विजयी होणाऱ्या अपक्ष उमेदारांच्या संख्येत घट पहायला मिळू लागली.

99 टक्के उमेदवारांचं डिपॉझिट जप्त

1991 पासून जवळपास 99 टक्के अपक्ष उमेदवारांचे डिपॉझिट जप्त झाल्याची आकडेवारी समोर आली आहे.

1988 मध्ये सहा जणांना विजय

1998च्या लोकसभा निवडणुकीत 1915 अपक्ष उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले. मात्र केवळ सहा उमेदवारांनाच विजय मिळण्यात यश आले. 

1999 च्या लोकसभा निवडणुकीत सहा अपक्ष उमेदवारांनी विजय मिळवला. 

यानंतर 2004 च्या लोकसभा निवडणुकीत 5 अपक्ष उमेदवारांनी विजय मिळवला. 

2009 च्या लोकसभा निवडणुकीत 9 तर 2024 च्या लोकसभा निवडणुकीत 3 अपक्ष उमेदवारांना विजय मिळवण्यात यश मिळाले. 

2019 मध्ये तब्बल 8000 हून अधिक अपक्ष उमेदवारांनी निवडणूक लढवली होती मात्र, केवळ 4 जणांनाच विजय मिळवता आला.

यंदाच्या लोकसभा निवडणुकीत आता किती अपक्ष उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरतात आणि त्यापैकी किती जणांना विजय मिळवण्यात यश मिळते हे पहावं लागेल.