सांगली समाचार - दि. ८ एप्रिल २०२४
सांगली - सर्वसामान्यांचा आधार बनलेल्या सांगली येथील कृष्णाई नागरी सहकारी पतसंस्थेचे यशस्वी घोडदौड सुरूच आहे. चालू आर्थिक वर्षात 98% वसुली झाली असून बारा कोटी आठ लाखाच्या ठेवी तर कर्जवाटप 9 कोटी 98 लाखाचे झाले आहे. संस्थेस 21. 23 लाखाचा नफा झाला असल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष भगवंतराव जोशी व उपाध्यक्ष प्रतापराव चव्हाण यांनी दिली.
संस्थेची मार्च 2024 अखेर प्रगतीच्या आकडेवारीची माहिती देताना भगवंतराव जोशी म्हणाले की वसूल विभाग वंडवळ एक कोटी 31 लाख असून खेळते भांडवल 16 कोटी 65 लाख तसेच संस्थेचा व्यवसाय 22 कोटी 06 लाखाचा झालेला आहे. संस्थेने यावर्षीही शून्य टक्के एनपीए राखण्यात यश मिळवले आहे असे अध्यक्ष व उपाध्यक्ष आणि सांगितले. यावेळी संस्थेचे संचालक विनायकराव शिंदे उपस्थित होते.
चालू आर्थिक वर्षात संचालक मंडळ, सल्लागार मंडळ, सभासद, ठेवीदार, कर्जदार, हितचिंतक, सेवक वर्ग, पिग्मी एजंट, सचिव अरुण सुतार यांनी अतिशय चांगले सहकार्य केल्याबद्दल जोशी यांनी सर्वांचे आभार मानले.