Sangli Samachar

The Janshakti News

लष्कराची पॉवर वाढली; रशियाचे 24 इग्ला-एस मॅनपॅड्स दाखलसांगली समाचार - दि. १३ एप्रिल २०२४
नवी दिल्ली - भारतीय लष्कराला रशियन बनावटीची इग्ला-एस मॅन पोर्टेबल एअर डिफेन्स सिस्टम (मॅनपॅड्स)च्या पहिल्या बॅचमध्ये 24 इग्ला-एस मिळाली. ज्यात 100 क्षेपणास्त्रांचा समावेश आहे. इग्ला-एस सिस्टम आल्याने भारतीय लष्कराची पॉवर वाढणार आहे. तसेच वायू संरक्षणाच्या क्षमतेत वाढ होणार आहे. इग्ला-एस हाताने चालवले जाणारे डिफेन्स सिस्टम आहे. याला कोणतीही व्यक्ती ऑपरेट करू शकते. उड्डाण करणा-या विमानाला पाडण्यासाठी याचा वापर होणार आहे.


इग्ला एस सिस्टमला देशाच्या उत्तरेच्या सीमेकर आणि उंच डोंगराळ भागात तैनात केले जाईल. डोंगराळ भागात इग्ला एस मॅनपॅड्स खूपच फायदेशीर ठरतात. इग्ला-एसमध्ये 9एम 342 मिसाइल, 9पी 522 लॉन्चिंग मॅकेनिज्म, 9व्ही 866-2 मोबाइल टेस्ट स्टेशन आणि 9एफ 719-2 टेस्ट सेटचा समावेश आहे. गेल्याकर्षी रशियासोबत 120 लॉन्चर आणि 400 मिसाईलच्या करारावर स्वाक्षऱया करण्यात आल्या होत्या.