Sangli Samachar

The Janshakti News

इलेक्ट्रिक वाहनांची विक्री घटली



सांगली समाचार - दि. १३ एप्रिल २०२४
मुंबई - देशभरात सणासुदीच्या काळात वाहन खरेदीला प्राधान्य दिले जाते. यंदा पाडव्यानिमित्त गेल्या आठ दिवसांत पुण्यात 7 हजार 336 वाहनांची नोंदणी झाली आहे. मागील वर्षीच्या तुलनेत यंदा इलेक्ट्रिक वाहनांच्या नोंदणीत तब्बल 85 टक्के घट नोंदविण्यात आली आहे. यंदा पाडव्यानिमित्त केवळ 137 इलेक्ट्रिक वाहनांची नोंदणी झाली आहे. गेल्या वर्षी पाडव्यानिमित्त 1 हजार 49 ई-वाहनांची नोंदणी झाली होती. त्यात यंदा 85 टक्क्यांपर्यंत घट झाली आहे. यंदा ई-वाहनांमध्ये 88 दुचाकी, 46 मोटारी आणि 3 मालमोटारींचा समावेश आहे.


इलेक्ट्रिक वाहनांची विक्री घटनेमध्ये अनेक कारणांचा समावेश आहे. यामध्ये सर्वात मोठे कारण म्हणजे, सर्वसामान्यांच्या आवाक्या बाहेरील वाहनांच्या किमती. दुसरे कारण वाहनांना लागणारी अचानक आग. याशिवाय वाहनांच्या बॅटरींची किंमत. तसेच चार्जिंग केल्यानंतर केवळ शहरी भागातच या वाहनांचा उपयोग  होतो. त्यामुळे अन्य शहरात जायचे असेल तर, वेगळ्या वाहनाची सोय करावी लागते, परिणामी इतकी मोठी गुंतवणूक करूनही जर इलेक्ट्रिक वाहन उपयोगाचे नसेल तर काय उपयोग ? असा विचार सर्वसामान्य नागरिकांतून होत आहे.