Sangli Samachar

The Janshakti News

'लाल परीचा प्रवास महागणार, राज्य महामंडळाकडे 10 टक्के वाढीचा प्रस्ताव| सांगली समाचार वृत्त |
मुंबई - दि.१६ एप्रिल २०२४
गोर गरिबांची 'लाल परी' अर्थात एसटी बसचा प्रवास महागणार आहे. महसूल वाढवण्यासाठी, एसटीने उन्हाळी सुटीकाळात सर्व तिकिटांमध्ये 10 टक्के वाढ केली आहे. एसटीने तसा प्रस्ताव राज्य महामंडळाकडे मंजुरीसाठी पाठवला आहे. महसूल वाढवण्यासाठी, एसटीने उन्हाळी सुटीकाळात सर्व तिकिटांमध्ये 10 टक्के वाढ केली आहे. एसटीने तसा प्रस्ताव राज्य परिवहन महामंडळाकडे मंजुरीसाठी पाठवला आहे. ही भाडेवाढ 15 एप्रिल ते 15 जून दरम्यान होणार आहे. दिवाळीतही अशीच वाढ केली जाते.

उन्हाळी सुट्यांत लोक गावी व पर्यटनासाठी प्रवास करतात. या काळात प्रवासी बसची संख्या 13,000 पर्यंत वाढते. रोज सुमारे 55 लाख प्रवासी असतात. आचारसंहितेमुळे निवडणूक आयोगाच्या परवानगीने प्रस्ताव पाठवण्यास सांगितले आहे. हंगामी भाडेवाढ करण्यासाठी राज्य परिवहन प्राधिकरणाची मंजुरी आवश्यक आहे. त्यामुळे हा प्रस्ताव परवानगीसाठी राज्य परिवहन प्राधिकरणाच्या मंजुरीसाठी पाठविण्यात आला आहे.


दरम्यान, लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता सुरू असल्याने परिवहन प्राधिकरणाने निवडणूक आयोगाची परवानगी घेऊन महामंडळाला प्रस्ताव पुन्हा पाठविण्यास सांगितल्याचे एसटीतील वरिष्ठ अधिकार्‍यांनी सांगितले.