yuva MAharashtra नाशिकमध्ये सोळा वर्षाच्या मुलाचा हृदयविकाराने मृत्यू

नाशिकमध्ये सोळा वर्षाच्या मुलाचा हृदयविकाराने मृत्यू



| सांगली समाचार वृत्त |
नाशिक - दि.१६ एप्रिल २०२४
सध्या हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यूमुखी पडणाऱ्यांची संख्या झपाट्याने वाढत आहे. हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यूची प्रकरणे 30 वर्षांवरील नागरिकांमध्ये जास्त दिसून येतात. मात्र, हृदयविकाराचा झटका साधारणपणे वयाच्या तीस वर्षापूर्वी येत नाही, असेही आरोग्य तज्ज्ञांकडून सांगण्यात आले आहे. मात्र, नाशिकमध्ये अवघ्या 16 वर्षांच्या मुलाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. त्यामुळे आता संपूर्ण शहरातून या घटनेवर हळहळ व्यक्त होत आहे.

दरम्यान, नाशिकच्या लहवित गावातील एका सोळा वर्षीय शालेय विद्यार्थ्याचा हृदयविकाराचा झटका येऊन मृत्यू झाला. रविवारी (14एप्रिल) रात्री उशिरा ही घटना घडल्याचे सांगण्यात येत आहे.