Sangli Samachar

The Janshakti News

"केंद्राच्या सल्लागारानेच देशाच्या समस्या सोडवण्याबाबत व्यक्त केली असमर्थता"



सांगली समाचार - दि. २९ मार्च २०२४
नवी दिल्ली- काँग्रेस नेते पी चिदंबरम यांनी बुधवारी मुख्य आर्थिक सल्लागार व्ही अनंथा नागेश्वरन यांच्या अहवालावरून भाजपच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. अनंथा नागेश्‍वरन यांनी या अहवालात म्हटले आहे की सरकार सर्व सामाजिक आणि आर्थिक समस्या सोडवू शकत नाही. त्यांच्या या विधानावर आक्षेप घेत चिदंबरम यांनी म्हटले आहे.

की बेरोजगारीची समस्या सोडवण्यासाठी कॉंग्रेस पक्षाकडे ठोस उपाययोजना आहे. प्रत्येक सामाजिक आणि आर्थिक समस्या सोडवण्यास सरकार असमर्थ आहे या नागेश्‍वरन यांच्या विधानाला आक्षेप घेताना चिदंबरम यांनी एक्सवरील एका पोस्टमध्ये म्हटले आहे की, मुख्य आर्थिक सल्लागारांनी दिलेली ही कबुली सर्वात धक्कादायक कबुली हे. ‘सरकार बेरोजगारीची समस्या सोडवू शकत नाही असे त्यांचे म्हणणे अत्यंत धक्कादायक आहे.

ते म्हणाले, की ही जर भाजप सरकारची अधिकृत भूमिका असेल, तर आम्ही धैर्याने भाजपला ‘तुमची जागा खाली करा’ असे सांगितले पाहिजे, असे चिदंबरम म्हणाले. बेरोजगारीच्या समस्येवर मात करण्यासाठी काँग्रेसकडे ठोस योजना आहे आणि ती त्यांच्या जाहीरनाम्यातून समोर येईल, असे चिदंबरम म्हणाले.