Sangli Samachar

The Janshakti News

'शास्त्रज्ञाना भूताने झपाटले' 'घोस्ट पार्टिकल' चा शोध सुरू




सांगली समाचार - दि. २६ मार्च २०२४
मुंबई - विश्वात अनेक रहस्ये दडलेली आहेत. वर्षानुवर्षे शास्त्रज्ञ या रहस्यांचे गूढ उकलण्याचा प्रयत्न करत असतात. मात्र अद्याप अनेक गोष्टी त्यांच्या आकलनाच्या पलीकडे आहेत. त्यापैकीच एक म्हणजे भूतकण म्हणजेच घोस्ट पार्टिकल. भूतकण अत्यंत गूढ, मायावी समजले जातात. त्यांना कुणी स्पर्श करू शकत नाही. ते सामान्य डोळ्यांना दिसत नाहीत. आपल्या भौतिक जगात ते कुणाशीही क्रिया करत नाहीत. एखाद्या भुताप्रमाणे ते कुठल्याही वस्तूच्या आरपार जातात. पृथ्वीवरील कोणत्याही उपकरणाने त्यांना अद्याप शोधता आलेले नाही. रहस्यमय भूतकणांवर आता युरोपची सेंटर फॉर पार्टिकल रिसर्च म्हणजे 'सेर्न' संस्था संशोधन करत आहे. त्यासाठी त्यांना एका खास उपकरणाची मदत होणार आहे. हे उपकरण आधीच्या उपकरणापेक्षा कित्येक पट अधिक संवेदनशील असे आहे. आपल्या आजूबाजूला अगणित भूतकण आहेत, पण आपण त्यांना शोधू शकत नाही. 'सेर्न'आता त्या दृष्टीने काम करत आहे. एकदा का त्यांचे संशोधन यशस्वी झाले तर विश्वाचा खऱया अर्थाने शोध घेता येईल.

विश्व समजून घेताना…

आपले विश्व अनेक कणांचे बनलेले आहे. त्यापैकी फारच थोडय़ा कणांविषयी आपल्याला ठाऊक आहे. मात्र विश्वातील 95 टक्के कणांची उकल होणे बाकी आहे. त्यापैकी सर्वाधिक भाग 'घोस्ट पार्टिकल' म्हणजे भूतकणांनी व्यापलेला आहे.


– 'घोस्ट पार्टिकल'ला वैज्ञानिकदृष्टय़ा न्यूट्रिनो असे म्हटले आहे. अणू हे पदार्थांचे मूलभूत घटक आहेत, पण शास्त्रज्ञांनी अणूच्या पलीकडे जाऊन प्रोटॉन, इलेक्ट्रॉन, न्यूट्रॉन या सबअॅटॉमिक कणांचा शोध लावला आहे. त्यापैकी न्यूट्रॉनचा आकार सर्वाधिक लहान असून ते विश्वात विपुल प्रमाणात आहेत. गूढ भूतकणांचा शोध भौतिकशास्त्र, खगोल भौतिकशास्त्र आणि विश्वाच्या व्यापक आकलनाच्या दृष्टीने खूप महत्त्वाचा आहे.
– न्यूट्रिनोचा उल्लेखनीय पैलू म्हणजे ते प्रस्थापित भौतिकशास्त्राच्या नियमांचे उल्लंघन करतात. हे मायावी कण अशा रीतीने काम करतात की, विश्वाच्या सध्याच्या समजाला आव्हान देतात.