Sangli Samachar

The Janshakti News

'मरावे परि अवयवरुपी उरावे' याविषयी डॉ. हेमा चौधरी यांचे व्याख्यान संपन्नसांगली - दि. १३|०२|२०२४

आष्टा - प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय आष्टा सेंटर येथे  दि ९ फेब्रुवारी २०२४ रोजी  जनजागृती कार्यक्रम अंतर्गत मरावे परि अवयव रुपी उरावे या विषयावर दि फेडरेशन ऑफ ऑर्गन अँड बॉडी डोनेशन च्या सांगली जिल्हा समन्वयक मा. डॉ. हेमा चौधरी यांनी नेत्रदान, त्वचा दान, देहदान आणि अवयव दान याविषयी शास्त्रोक्त आणि प्रभावी असे व्याख्यान देऊन  सर्वांच्या प्रश्नांचे शंका निरसन केले.

तसेच फेडरेशनचे जिल्हा कार्यकारिणी सदस्य मा.युवराज मगदूम यांनी ब्लड डोनेशन संदर्भात माहिती दिली आणि फेडरेशनच्या जिल्हा कार्यकारिणी सदस्या मा. पद्मजा माने मॅडम यांनी सांगली जिल्ह्याच्या अवयव दान हेल्पलाइनची तसेच फेडरेशनच्या इंस्टाग्राम पेजची माहिती दिली. आणि उपस्थित


लोकांच्या शंकांचे निरसन केले.

याप्रसंगी आष्टा येथील नेत्रदान सेवा प्रतिष्ठान संस्थेचे मा.सूर्यकांत जुगधर सर यांनी आष्टा येथे सुरु असलेल्या नेत्रदान चळवळीबाबत माहिती सांगून नेत्रदान केलेल्या एका कुटुंबाचा सन्मान  मा.डॉ.हेमा चौधरी मॅडम यांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन केला.

तसेच आष्टा येथील मा.पाटील काका यांनी देहदान, रक्तदान या विषयावर चारोळ्या सादर केल्या. मा.डॉ प्रगती पाटील मॅडम यांनी फेडरेशनच्या कामाचे कौतुक करुन या कार्यास सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.

या कार्यक्रमात विशेष करुन आष्टा नगरपरिषद येथील माजी नगराध्यक्षा मा.जिनत अत्तार मॅडम यांनी स्वतःच्या मुलीचे लिव्हर transplant करुन स्वतः मध्ये बसवल्यामुळे आज त्या हयात आहेत , असे मत  व्यक्त केले. आणि अवयव दानाचे महत्त्व सांगितले.

शेवटी आभार मा. हेमा दिदी यांनी उपस्थित आमचे आभार मानले.