Sangli Samachar

The Janshakti News

पुणे गुन्हेगारीमुक्त करण्यासाठी पोलिस ॲक्शन मोडवर

 


सांगली समाचार - दि. १८|०२|२०२४

पुणे - पुणे तिथे काय उक्ती ही उगते गुन्हेगारीच्या बाबतीतही अलीकडच्या काळात दिसून येत होती. शरद मोहोळ खून प्रकरणानंतर एका पाठोपाठ एक गुन्ह्यांची मालिकाच जणू पुण्यात दिसून येत होती. परिणामी पोलिसांच्यावर सोशल मीडियासह चोहोबाजूंनी आरोपांच्या फैली झडत होत्या. याची दखल घेत या गुन्हेगारीला वचक बसविण्यासाठी पोलीस दल आता चांगलंच ॲक्शन मोडमध्ये आले आहे. नुकताच दिवसांपूर्वी पुणे पोलीस आयुक्त पदाचा भार अमितेश कुमार यांनी स्वीकारला आहे. त्यानंतर त्यांनी गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी वेगवेगळे उपक्रम राबवायला सुरूवात केली आहे. 

पुणे पोलिसांची आता गुन्हेगारांवर गुप्त नजर असणार आहे. पुणे पोलीस दलात क्रिमिनल इंटेलिजन्स युनिट  स्थापन करण्यात येणार आहे. पुणे पोलीस दलातील गुन्हे शाखा आणि सायबर शाखेतील कर्मचाऱ्यांना एकत्रित करत करण्यात येणार आहे. त्यासाठी या नव्या युनिटची स्थापना केली जात असल्याची माहिती पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिली आहे.

गुन्हेगारी कमी करण्यासाठी पोलीस दलाची कारवाई

पुणे पोलीस आता गुन्हेगारांची डिजिटल कुंडली काढणार आहे. प्रत्येक गुन्हेगाराचं सोशल मीडिया अकाउंट पुणे पोलीस सातत्याने तपासणार आहेत. शहरातील गुन्हेगारी कमी करण्यासाठी पुणे पोलीस दलाची कारवाई सुरू आहे. क्रिमिनल इंटेलिजन्स युनिट शहरातील गुन्हेगारांवर गुप्तपणे नजर ठेवून असणार आहे. त्यामुळे परिणामी पोलिसांना सर्व माहिती मिळत राहील.

गुन्हेगारी कमी करण्यासाठी पुणे पोलीस दल चांगलंच ॲक्शनमोडमध्ये आलं आहे. नुकत्याच झालेल्या शरद मोहोळ हत्या प्रकरणामुळे पुण्यातील कायदा आणि सुव्यवस्थेबाबत चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. या अनुषंगाने कुख्यात गुंडांवर कारवाई करण्याचे आणि गुन्ह्यांवर कारवाई करण्याचे निर्देश पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचाऱ्यांना देण्यात आले आहेत.

पुण्यात गुन्हेगारांची परेड

आयुक्त अमितेश कुमार यांनी हाती घेतलेला हा एक उल्लेखनीय उपक्रम आहे. याअगोदर त्यांनी सलग दोन दिवसांची गुन्हेगारांची परेड घेतली होती. यामागे गुन्हेगारीमुक्त शहर बनवणे आणि कायदा मोडणाऱ्यांना स्पष्ट इशारा देणे, हा उद्देश  होता. या उपक्रमामुळे पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे मनोबल लक्षणीयरित्या उंचावलं आहे.

पुणे पोलिसांकडून गुंडांच्या सोशल मीडिया अकाउंटवर लक्ष ठेवण्यात येत आहे. आयुक्त अमितेश कुमार यांनी गुंडांना दहशत निर्माण होईल अशा पोस्ट किंवा व्हिडिओ सोशळ मीडियावर टाकण्यास मनाई केली आहे.