सांगली समाचार - दि. १८|०२|२०२४
नवी दिल्ली : "आरोग्य आणि वयाच्या समस्यांमुळे आपण आगामी लोकसभा निवडणूक लढवणार नाहीत," असा भावनिक खुलासा काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या सोनिया गांधी यांनी गुरुवारी त्यांच्या उत्तर प्रदेशातील रायबरेली लोकसभा मतदारसंघातील मतदारांना पत्र पाठवून केला आहे.
यानंतर मला कदाचित तुमची थेट सेवा करण्याची संधी मिळणार नाही, पण माझे मन आणि आत्मा सदैव तुमच्या पाठीशी राहील. मला माहीत आहे की, तुम्ही भूतकाळात जसे होता तसे भविष्यातही माझ्या आणि माझ्या कुटुंबाच्या पाठीशी उभे राहाल," असे सोनिया गांधी म्हणाल्या.
"हे नाते मला वारशाने मिळाले आहे. माझ्या सासू इंदिरा गांधी आणि पतींना गमावल्यानंतर मी तुमच्याकडे आले आणि तुम्ही मला खुल्या हातांनी स्वीकारले, गेल्या दोन लोकसभा निवडणुकांमधून प्रतिकूल परिस्थितीत तुम्ही मला दिलेला खंबीर पाठिंबा मी कधीही विसरू शकत नाही, मी लवकरच तुम्हा सर्वांना भेटेन," असेही त्या म्हणाल्या.