Sangli Samachar

The Janshakti News

चाकूच्या धाकाने पळवून नेऊन युवतीवर अत्याचार, तरुणावर बलात्काराचा गुन्हा

 


सांगली समाचार  - दि. २०|०२|२०२४

सांगली - मिरज पश्चिम भागातील एका युवतीस चाकूचा धाक दाखवून तसेच आईला ठार मारेन अशी धमकी देऊन लैंगिक अत्याचार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी पीडित युवतीने संशयित अनिल श्रीमंत जाधव (वय ४१, रा.तुंग, ता. मिरज) याच्याविरूद्ध सांगली ग्रामीण पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. जाधव याच्याविरूद्ध ॲट्रॉसिटी आणि लैंगिक अत्याचाराबद्दल गुन्हा दाखल झाला आहे.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी, संशयित जाधव हा काही दिवसापासून पीडित युवतीच्या मागावर होता. ३० जानेवारीला युवतीचा त्याने जीप (एमएच १० इए ११००) मधून पाठलाग केला. तिला अडवून 'तू मला आवडतेस' असे म्हणाला. युवतीने नकार देताच चाकूचा धाक दाखवला. तुझ्या भावाला नोकरीवरून काढून टाकेन, आईला ठार मारेन अशी धमकी देत जीपमध्ये जबरदस्तीने बसवले. त्यानंतर अंकली येथील एका लॉजवर नेऊन लैंगिक अत्याचार केला. 

त्यानंतर जाधव याने १० फेब्रुवारी रोजी युवतीला पुन्हा धमकी देत मोटारीतून जबरदस्तीने आष्टा येथे नेले. तेथून पडवळवाडी येथे मित्राच्या खोलीवर ठेवून लैंगिक अत्याचार केला. पीडित युवतीची तेथून सुटका झाल्यानंतर तिने सांगली ग्रामीण पोलिस ठाणे गाठून फिर्याद दिली.

युवतीच्या फिर्यादीनुसार जाधव याच्याविरुद्ध लैंगिक अत्याचार आणि ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उशिरापर्यंत त्याला अटक करण्यात आली नव्हती. पोलिस उपअधीक्षक अण्णासाहेब जाधव तपास करत आहेत.