Sangli Samachar

The Janshakti News

अन्यथा "लाल परी"ची चाके थांबणार ?

 


सांगली समाचार  - दि. १५|०२|२०२४

मुंबई  - चार महिने उलटून गेले मात्र मागण्या काही पूर्ण झाल्या नाही अशात विविध प्रलंबित मागण्यांसाठी एसटी कर्मचारी उपोषणास बसले आहे तसेच मागण्या मान्य झाल्या नाहीत तर एसटी सेवा बंद करण्यात येईल, असा इशारा महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेने दिला आहे. एसटी कर्मचाऱ्यांच्या सप्टेंबर 2023 मध्ये महागाई भत्याची, घरभाडे भत्याची आणि वार्षिक वेतनवाढीच्या थकबाकीची रक्कम देणार असा अनेक मागण्या 15 दिवसात पूर्ण होणार होत्या. मात्र मागण्यांबाबत कोणताच विचार होत नसल्याने कर्मचारी संतप्त झाले आहेत. उपोषणानंतरही मागण्या मान्य झाल्या नाहीत, तर एसटी सेवा बंद करण्यात येईल, असा इशारा महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेने दिला आहे.


एसटी कामगारांना सातवा वेतन आयोग लागू करणे, सेवानिवृत्त कर्मचार्‍यांची प्रलंबित देणी या मागण्यांवर मान्यताप्राप्त संघटनेसमवेत चर्चा करून समितीने शासनाला 60 दिवसांत अहवाल सादर करण्याचे मान्य केले आहे. मात्र चार महिने लोटले तरी अहवाल सादर झाला नाही त्यामुळे आता उपोषण सुरू केले असल्याचे महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेने स्पष्ट केले. कर्मचार्‍यांनी 13 फेब्रुवारीपासून बेमुदत उपोषण सुरू केले आहे. राज्यातील विभाग पातळीवर उपोषणास सुरुवात केली असून सरकारने दखल न घेतल्यास आगार पातळीवरील कर्मचारी उपोषणाला बसून काम बंद आंदोलन सुरू करतील. त्यामुळे एसटी सेवा ठप्प होईल, असा इशारा महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेने दिला आहे.