Sangli Samachar

The Janshakti News

मनोज जरांगेंच्या ताफ्यात ब्रेकफेल झालेला पिकअप घुसला, घातपाताचा संशय





सांगली समाचार - दि. ११|०२|२०२४

मराठा आरक्षणासाठी लढा देणाऱ्या मनोज जरांगे पाटील हे आजपासून  बेमुदत उपोषण सुरू केले आहे. मात्र, उपोषणाच्या पूर्वी साल्हेर किल्ल्याजवळ आपल्या ताफ्यात ब्रेक फेल झालेले पिकअप सारखे वाहन घालून घातपात करण्याचा प्रयत्न करण्यात आला, असा गंभीर आरोप मनोज जरांगे-पाटील यांनी केला आहे.

या विषयी आपण मनोज चिवटे यांच्याकडे चौकशीची मागणी केली आहे. पीकअप घालणाऱ्या ड्रायव्हर विषयी आम्ही कोणतीही तक्रार दिली नाही, असे देखील मनोज जरांगे यांनी स्पष्ट केले. सरकारने काढलेल्या सगेसोयरे अधिसूचनेचे कायदा करावा, या मागणीसाठी मनोज जरांगे हे अंतरवाली सराटीमध्ये आजपासून उपोषण सुरू करत आहेत. सरकारने मराठा आरक्षणाच्या संदर्भात 15 फेब्रुवारीला अधिवेशन बोलावले आहे. मात्र, पुढील दोन दिवसांत विशेष अधिवेशन बोलवा आणि अधिसूचनेचे कायद्या करा, अशी मागणी मनोज जरांगे यांनी केली आहे.

सरकारच्या कॅबिनेटला विशेष अधिवेशन बोलवण्याचे अधिकार आहेत. त्यांनी त्याचा वापर करावा, असे देखील जरांगे पाटील म्हणाले. छगन भुजबळ यांना त्यांच्या जीवाला धोका असल्याचे पत्र आले आहे. यावर ज्याला धोका असतो तो असा सांगत नाही, असा टोला मनोज जरांगे पाटील यांनी लगावला.

मनोज जरांगे म्हणाले, आमचा घातपात करण्याचा प्रयत्न करण्यात आला.मात्र आम्ही कोणाला सांगितले नाही. साल्हेर किल्ल्याजवळ वर वाहनांना परवानी नसताना देखील एक पीकअप सारखे ब्रेक फेल झालेले वाहन आमच्या ताफ्यात आले होते. मात्र, लोकांनी उड्या टाकल्या. त्या वाहनाच्या ड्रायव्हरला पोलिसांनी पकडले असता त्याने ते वाहन आमच्या ताफ्यात घातलण्यासाठी त्याला कोणीतरी घालण्यास सांगितले होते, अशी कबूली दिली आहे.