Sangli Samachar

The Janshakti News

सांगलीतील व्यापा-याचा बंगल्यात धाडसी दरोडा टाकणा-या गुन्हेगारांच्या मुसक्या आवळल्या

 


सांगली समाचार - दि. १४|०२|२०१४

सांगली - सांगली शहरातील कोल्हापूर रोडनजिक असलेल्या समर्थ कॉलनीतील विनोद खत्री यांच्या घरफोडी प्रकरणी पोलिसांनी दोन सराईत गुन्हेगारांच्या मुसक्या आवडल्या. या दोघांकडून २० लाखांची रोकड तसेच ८ लाख ५२ हजारांचे दागिने आणि एक ८० हजार रुपयांची दुचाकी असा सुमारे २९ लाख ३२ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

सांगली स्थानिक गुन्हे अन्वेषण खात्याच्या पथकाने कोल्हापूर रोडवरील अंकलीकर फाटा परिसरात या सराईत गुन्हेगारांना ताब्यात घेतले. राजू प्रकाश नागरगोजे (वय ३६, रा. उचगाव, जि. कोल्हापूर) आणि नितेश आडव्या चिकमठ (वय २९, रा. सावरकर कॉलनी, सांगली) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.

पोलीस अधीक्षक संदीप घुगे, अप्पर पोलीस अधीक्षक रिती खरोखर यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे अन्वेषण शाखेकडील अनिल ऐनापुरे, सचिन धोत्रे, कुबेर खोत, अरूण पाटील, प्रकाश पाटील, विनायक सुतार, अभिजीत ठाणेकर सुनील जाधव, रोहन घस्ते, सुरज थोरात, सायबर पोलीस ठाणेकडील श्रीधर बागडे, कॅप्टन गुंडवाडे, स्वप्नील नायकोडे, अजित पाटील यांचा या कारवाई केलेल्या पथकात सहभाग होता.