Sangli Samachar

The Janshakti News

जागतिक बँक अधिका-यांच्या भेटीने महापूर नियंत्रण प्रकल्पाला गती मिळणार

 

सांगली समाचार - दि. १४|०२|२०२४

सांगली - कृष्णा व वारणा नदीकाठाला असणारा महापुराचा धोका कमी करण्यासाठी, महापुराचे वाहून जाणारे अतिरिक्त पाणी दुष्काळी भागाकडे वळविण्यात येणार आहे. यासाठी जागतिक बँकेने सुमारे चार हजार कोटीचे अर्थसहाय्य मंजूर केले आहे.

या पार्श्वभूमीवर महापुराचा धोका असलेल्या क्षेत्राची पाहणी करण्यासाठी जागतिक बँकेचे पथक दाखल झाले होते. मंगळवारी या पथकातील दिपक अरोरा आणि सत्यप्रिया यांनी सांगलीतील आयर्विन पूल आणि सांगली जिल्ह्यांमधील वाळवा तालुक्यातील साटपेवाडी बंधारा परिसरातील बाधित क्षेत्राची पाहणी केली व महापुरामुळे होणा-या नुकसानीची माहिती घेतली. यावेळी त्यांच्यासमवेत जलसंपदा विभागाचे अधिक्षक अभियंता चंद्रशेखर पाटोळे यांच्यासह वरिष्ठ अधिकारी सहभागी झाले होते.सांगली जिल्ह्यातील कोल्हापूर जिल्ह्यातील नदीकाठच्या गावांची व शेतीची मोठ्या प्रमाणावर हानी होत असते. या भेटीमुळे प्रकल्पाला मिळणाऱ्या अर्थसहाय्याने गती मिळणार आहे. 

नदीकाठची पूरनियंत्रण रेषा, त्याअंतर्गत येणारी अनधिकृत बांकामे तसेच महापुराच्या दरम्यान जिल्हा प्रशासन व जलसंपदा विभागाकडून केल्या जाणा-या उपाय योजनांची माहिती घेतली.