Sangli Samachar

The Janshakti News

सांगली परिसरातील बेकायदेशीर खोकी हटविण्याचा धमाका सुरूच

 सांगली समाचार - दि. १४|०२|२०२४

सांगली - सांगली परिसरातील बेकायदेशीर खोकी हटविण्याची मोहीम मंगळवारीही राबवण्यात आली. दोनच दिवसांपूर्वी माधवनगर रोडवरील आर. टी. ओ. कार्यालयासमोरील काही बेकायदेशीर खोकी हटविण्यात आली होती. आज पुन्हा एकदा चार बेकायदेशीर खोकी हटवण्यात आली. त्याचप्रमाणे सांगलीतील हरभट रोडवरील अतिक्रमण करणारे फलकही हटविण्यात आले 

महापालिकेचे आयुक्त सुनील पवार यांच्या मार्गदर्शनाखाली उपायुक्त वैभव साबळे यांनी ही कारवाई केली. दरम्यान ही कारवाई करीत असताना गोरगरीब व्यापा-यांचे नुकसान होऊ देऊ नये, अशी मागणी नागरी हक्क समितीचे सतीश साखरकर यांनी केली आहे.