सांगली समाचार - दि. १४|०२|२०२४
मुंबई- विचारधारा ही सेक्युलरच आहे. त्यामुळे मी महायुतीत असलो तरी मी फुले, शाहू, आंबेडकर यांच्या विचारधारेवर चालणार असून मूळ विचार कधीच सोडणार नाही, असं प्रतिपादन राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलं आहे. ते सोशल मीडिया टीमला संबोधित करत होते.
अजित पवार पुढे म्हणाले, सोशल मीडिया हे एक दुधारी हत्यार आहे. एखादी चूक झाल्यानंतर टीव्ही चॅनलवाले रिपीट करून २०-२५ वेळा दाखवतात. खोटी गोष्ट ५० वेळा दाखवली सांगितली तर ती खरी वाटायला लागते. अनेकांना याची मोठी किंमत मोजावी लागली आहे. काहींनी चुका केल्या तरी त्यांच्या बातम्या येत नाहीत, हे सांगायची गरज नाही. मतदारांकडे पोहोचण्याकरीता सोशल मीडिया अत्यंत प्रभावी माध्यम आहे.
''आत्ताची पिढी Facebook वर फारशी नसून ट्विटर आणि यूट्यूबवर आहे. त्यांच्यानुसार भाषा आपल्याला वापरावी लागते. त्यांना डोळ्यासमोर ठेऊन आपण सगळं करत असतो. राजकारण हा परफेक्शनचा खेळ आहे. लोक तुमच्याबद्दल काय बोलतात, काय विचार करतात याला महत्त्व आहे. रोज सकाळी एक पुडी सोडून द्यायची आणि मग ती घरोघरी पोहचते, असं देखील काही लोक करतात.'' असं प्रतिपादन अजितदादांनी केलं आहे.
अजित पवार पुढे म्हणाले, सोशल मीडिया हे एक दुधारी हत्यार आहे. एखादी चूक झाल्यानंतर टीव्ही चॅनलवाले रिपीट करून २०-२५ वेळा दाखवतात. खोटी गोष्ट ५० वेळा दाखवली सांगितली तर ती खरी वाटायला लागते. अनेकांना याची मोठी किंमत मोजावी लागली आहे. काहींनी चुका केल्या तरी त्यांच्या बातम्या येत नाहीत, हे सांगायची गरज नाही. मतदारांकडे पोहोचण्याकरीता सोशल मीडिया अत्यंत प्रभावी माध्यम आहे.
पवार म्हणाले की, महायुतीत असलो तरी फुले, शाहू, आंबेडकर यांची विचारधारा आपली आहे. त्यांचे विचार मी कधीच सोडणार नाही. छत्रपती शिवाजी महाराजांच्या गुरू या माँ जिजाऊ आहेत, ही माझी नाही तर आमच्या पक्षाची भूमिका आहे. सध्या वातावरण गढूळ करण्याचं काम काही जण करत आहेत. उचलली जीभ लावली टाळ्याला असं काही जणांचं सुरू आहे. सोशल मीडियावर जर कोणी काही बोलत असेल आपली बदनामी करत असेल तर त्यांची गया करू नका रीतसर तक्रार करा, असं आवाहन पवार यांनी केलं आहे.