Sangli Samachar

The Janshakti News

कुंपनानेच शेत खाल्ले : क्राईम ब्रँच खात्यातील पोलिसाचाच "क्राईम"
सांगली समाचार - दि. १४|०२|२०२४

मुंबई - नोकरीच्या आणि विविध योजनांच्या माध्यमातून पैशाचे आम्हीच दाखवून फसवणूक करणाऱ्यांची संख्या छोटी नाही, अशा ऑनलाइन फसवणूक करणाऱ्यांच्या मुस्क्या आवळण्यासाठी शासनाचा एक विभाग नेहमी सतर्क असतो. मात्र जेव्हा कुंपण शेत खात तेव्हा आश्चर्य करण्यात येतं.


असाच एक प्रकार उघडकीस आला, मुंबई पोलिस दलात क्राईम ब्रॅंचमध्ये कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्याने सांगलीतील एकाची ४० हजारांची फसवणूक केल्याबाबत मोहनदास हणमंत जोगदंड (रा. हसनी आश्रम नजीक, श्रीरामनगर, वालनेसवाडी, सांगली ) यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद नोंदविली आहे.

विक्रांत कसरनाथी रावळ (वय ४०, रा. बी विंग, हप्पी स्मृती, साईनगर, नवघर, वसई वेस्ट ) याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.


संशयित विक्रांत रावळ याने जोगदंड यांना ८० लाख रुपये कर्ज मंजूर करुन देण्याचे आमिष दाखविले. त्यासाठी जोगदंड यांच्याकडून वेळोवेळी ८० हजार रुपये घेतले. परंतु कर्ज मंजूर केले नाही. त्यामुळे जोगदंड यांनी पैसे परत मिळावेत यासाठी पाठपुरावा सुरु केला. त्यामुळे रावळ याने ४० हजार रुपये परत केले. उर्वरित पैशांसाठी बऱ्याच पाठपुराव्यानंतरही ते मिळाले नाहीत, त्यामुळे आपली फसवणूक झाल्याचे जोगदंड यांच्या लक्षात आले. त्यांनी पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली. पोलीस अधिक तपास करीत आहेत.