Sangli Samachar

The Janshakti News

मोदी पुन्हा विजयी झाल्यास प्रादेशिक पक्ष संपतील" - पी. चिदंबरम
सांगली समाचार  - दि. १४|०२|२०२४

नवी दिल्ली - मोदी यांनी तिसऱ्यांदा तेच सत्तेत येण्याचे संकेत दिले आहे. काही जनमत चाचण्यांद्वारेही हेच निष्कर्ष काढण्यात आले आहेत. या पार्श्वभूमीवर जर मोदीच पुन्हा सत्तेत आले तर २०२४ नंतरचा काळ हा विरोधी पक्षांसाठी अडचणीचा असेल असे चिदंबरम यांनी म्हटले आहे. सरकारची पाठ थोपटताना मात्र ते म्हणाले की या सरकारचे एक वैशिष्ट्य आहे. कोणतीही गोष्ट लागू करायची असेल तर ती अत्यंत योग्य पध्दतीने लागू करतात. त्यांची अंमलबजावणीची प्रक्रिया अगदी उत्तम आहे व हे मी मान्य करतो. ते मान्य करण्यास मला कोणतीही नाराजी असण्याचे काही कारण नाही.

मात्र देशाची अर्थव्यवस्था पाच ट्रिलियन करण्याच्या मुद्द्यावरून त्यांनी सरकारला घेरले. ते म्हणाले की सरकारने अगोदर २०२३-२४ पर्यंतची मुदत यासाठी मागितली होती. आता ते आणखी दोन वर्ष मागत आहेत. याचा अर्थ आता त्यांनी गोल पोस्टच फिरवला आहे. अर्थात पाच ट्रिलियनची अर्थव्यवस्था झाली तर आम्हाला सगळ्याना आनंदच होईल. देशात पीएमएलए कायद्याचा दुरूपयोग केला जातो आहे. कॉंग्रेसचे सरकार आले तर आम्ही हा कायदा रद्द करू आणि त्याला पर्यायी कायदा आणला जाईल. सध्या या कायद्याचा वापर राजकीय शस्त्रासारखा केला जातो आहे, अशी टीकाही चिदंबरम यांनी केली आहे.