Sangli Samachar

The Janshakti News

सांगलीत धाडसी दरोडा : पोलिसांकडून तपास पथके रवाना

सांगली समाचार | दि. ०८ | ०२ | २०२४

सांगली - कोल्हापूर रोड नजीक असलेल्या समर्थ कॉलनीतील विनोद श्रीचंद खत्री यांचा बंद असलेला बंगला फोडून भरदिवसा अज्ञात चोरट्यांनी धाडसी दरोडा टाकला. या घटनेने सांगली शहरात खळबळ माजली आहे.

या दरोड्यात डबल 18 तोळे सोने वीस लाखाची रोकड असा 28 लाख 52 हजारांवर डल्ला चोरट्यानी मारला आहे. भर वस्तीत असलेल्या या बंगल्याचे सीसीटीव्ही फोडून चोरट्याने बंगल्यात प्रवेश केला.

हा प्रकार लक्षात आल्यानंतर विनोद खत्री यांनी सांगली शहर पोलीस ठाण्यामध्ये फिर्याद दिली आहे. ही घटना सोमवार सकाळी ते मंगळवारी रात्रीच्या दरम्यान घडलेली असल्याचे खत्री यांनी फिर्यादीत म्हटले आहे.

दरम्यान घटनेचे गांभीर्य ओळखून पोलीस अधीक्षक संदीप घुगे, अप्पर अधीक्षक ऋतू खोकर, उपायुक्त अण्णासाहेब जाधव यांनी घटनास्थळी धाव घेऊन तपासाबाबत सूचना केली.

आपल्या मुलीच्या लग्न समारंभाच्या निमित्ताने खात्री हे कोल्हापूरला गेलेले होते. चोरट्याने पाळत ठेवून सोमवार ते मंगळवार मध्ये रात्रीच्या दरम्यान, खत्री यांच्या घराचा मागील बाजूचे दरवाजा तोडून हा धाडसी दरोडा टाकला. संशयाचा शोध घेण्यासाठी शहर आणि एलसीबीची खास दोन पथके चोरट्यांच्या मागावर पाठवलेली आहेत.