Sangli Samachar

The Janshakti News

चला जाणूया वास्तूशास्त्रास !




सांगली समाचार | मंगळवार दि. ०६ |०२|२०२४

नमस्कार मित्रांनो आज आपण वास्तुशास्त्रानुसार घरातील आग्नेय दिशा पाहूया आणि अग्नी दिशेचा आणि ज्योतिष शास्त्राचा म्हणजेच आपल्या पत्रिकेतील ग्रहांचा काय संबंध आहे ते पाहूया.

अग्नेय दिशा अग्नी या दिशेत म्हणजे सूर्य हा अग्नी स्वरूपात असतो. साधारणपणे सकाळी नऊ ते 11 काळात हा सूर्य जाणवतो. पंचमहाभूत तत्व देखील अग्नी तत्व येथे जाणवते. अग्नि हा एक संवादाचा माध्यम आहे आणि या माध्यमातून आपली अनेक कामे चालतात. अग्नीदोष निर्माण झाली तर विचित्र घटना पाहिला मिळतात. आग्नेय दिषेस दोष वाढले तर मित्रांकडून नुकसान आर्थिक हानी, चोरी, कर्जबाजारीपणा, मनुष्याला लागलेल्या चिंता, कधी कधी समाजात कलंक लागणे, निष्कारण दोष निर्माण होत असतात. हे सर्व कशामुळे घडते वास्तूमध्ये कुठले दोष निर्माण होतात आणि पत्रिकेतील कुठली दोष दिसून येतात.

आज आपण हे पाहूया काल पुरुषाच्या कुंडलीनुसार एकादस स्थान म्हणजे लाभस्थान व व्ययस्थानात आग्नेय दिशेचा अंमल असतो. येथे अग्नीचे स्वरूप दिसून येते. ही दिशा बिघडली तर पत्रिकेतील या स्थानात सुद्धा बिघड झालेला असतो आणि वास्तू आणि ज्योतिष यांचे कॉम्बिनेशन केले असता पत्रिकेतील दशाअंतर्गशा या काळातच जो बदल होतो तेव्हाच या घटना मोठ्या प्रमाणावर दिसून येतात. बऱ्याच प्रमाणात चोरी, कर्जबाजारीपणा, आर्थिक नुकसान जास्त प्रमाणात दिसून येते. व घरामध्ये अशी काय बिघाड असतात. उदाहरणार्थ अग्नेयेस विहीर असणे हे एक बाधित गोष्ट आहे.

समजा पत्रिकेत अग्नि तत्व बाधा आल्यास पंचम स्थान हे एकादश स्थानाची सातवे स्थान असल्यामुळे येथे अचानक संततीनाश होताना दिसून येतो. अग्नि दिशा वाढीव असेल तर महादोष मानावा लागतो. त्यामुळे त्याचा तीव्रपणे परिणाम वास्तूतील कर्त्या पुरुषाला भोगाव लागतो. अग्नीस कट येणे किंवा आग्नेय कोपरा अधिक वाढलेला असणे किंवा घटलेला असणे ही सुद्धा दोष असतात. या सर्व गोष्टी खूप काळजीने पहाव्या लागतात.

आग्नेय दिशा म्हणजे पूर्व आणि दक्षिणचा मध्य होय. घरातील अग्नी तत्व बॅलन्सिंग असणे खूप गरजेचे असते, अन्यथा हा एक प्रमुख दोष ठरून संतती दोष, संततीचे अपघात घरातील मोठे आजारपण, खर्चावर नियंत्रण नसले, आरोग्याची प्रश्न न सुटणे, वाढत्या मुलांबाबत प्रश्न न सुटणे, ही सर्व दोष दिसून तर येतात. परंतु विवाह विषयक मुलांच्या अडचणी सुद्धा निर्माण होतात.

व्ययस्थानाचा विचार येथूनच करावा, ज्या घरात अग्नी दिशा जपली जाते, त्या घरात ऐश्वर्या नांदताना दिसून येते. त्यामुळे बांधकाम करत असताना किंवा वस्तूची निवड करत असताना अग्नेय दिशेला महत्त्व देऊनच निवड करावी. या दिशेत अग्नी तत्व असल्यामुळे घरातील गृहस्वामीचा आत्मविश्वास आणि आरोग्य येथून समजते. अग्नि दिशेत दोष असेल तर व्यक्तीने स्वतःअध्यात्मिक उपाय करून प्रगती करावी.

अध्यात्मिक उपाय करत असताना गणपतीची उपासना ही खूप महत्त्वाची ठरते. स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देत असताना, आहारात बदल करून संतुलित असा आहार घेताना, आत्मविश्वास वाढतील अशा प्राणायाम चा वापर दैनंदिन जीवनात करावा. कारण की अग्नी दिशा ही उपदिशांमधील एक दिशा आहे. त्यामुळे तिचा उद्रेक होणे योग्य नाही.

ज्याच्या घरात अग्नी दिशेत दोष आहे अशा लोकांनी स्वतःच्या अति अहंकारात आणि वागण्यात लक्ष ठेवावे. वस्तूतील शौचालय सुद्धा या दिशेस असणे योग्य नाही. तसेच खड्डा, उतार ,सुद्धा योग्य दिसून येत नाही.

अग्निधी स्वयंपाक घर हे एक उत्तम प्रतिक आग्नेय दिशेत मानले जाते. अग्नी दिशेला योग्य ती उंची असणे, म्हणजे आग्नेय दिशाही ऐश्वर्या सुद्धा प्राप्त करून देत असते.

आग्नेय दिशेचे दार हा आग्नेय, अग्नी दिशेतील इतर देवता बघूनच निवडावा लागतो. लक्ष्मी पैकी धान्य लक्ष्मी या दिशेमध्ये असते आणि या दिशेचा ग्रह अधिपती शुक्र असतो. त्यामुळे अग्नी दिशेचा विचार आणि ऊर्जेचा विचार योग्य बॅलेन्स साधूनच उपाय करावे लागतात. अग्नि रंगसंगतीचा विचार खूप विचार करून करावा लागतो. कारण अग्नी दिशेतील बळ हे रंगावर सुद्धा अवलंबून असते. म्हणून प्रत्येकाने आपल्या घरातील आग्नेय दिशा बॅलन्स करून स्वतःची प्रगती साधावी.

अग्नेय दिशेत स्त्रियांचे वास्तव्य जास्त काळ असल्यास परिणामी त्यांच्या कार्यक्षेत्रावर सुद्धा परिणाम घडून येतो. म्हणून आग्नेय दिशेतील किचनसुद्धा बॅलेंसिंग करून सूर्यकिरणांचा सुद्धा विचार करावा. जेणेकरून स्वयंपाक घरातील अन्न शिजवताना निर्जंतुकीकरण जाणवेल. आग्नेय दिशेत उत्तम पद्धतीने किचन जर असेल, तर उत्कृष्ट पाककृती तयार होतात आणि आरोग्यदायी विकास होताना दिसून येतो. कारण या दिशेमध्ये कारकता शुक्र ग्रहाची आहे. त्यामुळे ही दिशा सांभाळणे फार गरजेचे आहे.



                मनीषा नांगरे कांडेकर
                       अहमदनगर.
                    7350042369