Sangli Samachar

The Janshakti News

सुप्रियाताईंविरुध्द पवार घराण्यातील व्यक्ती देण्याचे षडयंत्र हाणून पाडू - रोहित पवार




सांगली समाचार | मंगळवार दि. ०६ |०२|२०२४

बीड - बारामती लोकसभा मतदार संघात विद्यमान खासदार सुप्रिया सुळे यांच्या विरोधात पवार घराण्यातील उमेदवार देण्याच्या तयारीत असून हे आव्हान आम्ही स्विकारले असल्याचे खळबळजनक वक्तव्य केल्याने पवार घराण्यातील हा सत्तासंघर्ष अधिक तीव्र होण्याची चिन्हे दिसत आहेत.

बीड येथील एका कार्यक्रमानंतर पत्रकारांशी बोलताना रोहित पवार यांनी हा दावा केला आहे. नुकताच बारामती येथील कार्यक्रमात ज्या पध्दतीने अजितदादा बोलत होते, त्यातून त्यांचा अहंकार जनतेला पहायला मिळाल्याचे रोहित पवारांनी म्हटले आहे.

यावेळी अजितदादांनी जोरदार टीका करताना रोहित पवार म्हणाले की, निवडणुकीत सत्तेचा गैरवापर होण्याची शक्यता आहे. मात्र आम्ही जनतेला विश्वासात घेऊन या बलाढ्य शक्तीला प्रतिकार करू.

बीड येथील रयत शिक्षण संस्थेच्या कंटाळलेल्या महाविद्यालयाच्या नूतन इमारतीच्या उद्घाटनासाठी आलेल्या रोहित पवार यांना, बारामती येथील अजितदादांच्या आव्हानात्मक भाषणासंदर्भात छेडले असता, रोहित पवार यांनी जोरदार फटकेबाजी केली. पवार कुटुंबात फूट पाडण्याची कूटनीती भाजपा अवलंबत असल्याचा आरोपही रोहित पवार यांनी यावेळेस केला.