Sangli Samachar

The Janshakti News

नरेंद्र मोदींमध्ये लपलेला रावडी राठोड !

 


सांगली समाचार - दि. १८|०२|२०२४

नवी दिल्ली - मध्यंतरी अक्षय कुमारचा रावडी राठोड हा चित्रपट आलेला होता, यामधील एक डायलॉग आपणास ही आठवत असेल, "जो मै बोलता हूँ वह करता हूँ... जो नही बोलता व डेफिनेटली करता हूँ... सध्या नरेंद्र मोदींच्या बाबतीत हेच वाक्य तंतोतंत ठरतं आहे...

आगामी काळात होणाऱ्या लोकसभा निवडणुकीसाठी भाजपचा प्लॅन ठरला आहे. त्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केंद्रीय मंत्रिमंडळातील सात शिलेदारांना राज्यसभेसाठी उमेदवारी न देता लोकसभेच्या आखाड्यात उतरविण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यसभेच्या खासदारांबाबत गेल्या वर्षीचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभेच्या आखाड्यात उतरविण्याचे संकेत दिले होते.

येत्या काळात होत असलेल्या राज्यसभा निवडणुकीसाठी भाजपने २८ उमेदवार जाहीर केले. त्यातील २४ नवीन चेहरे आहेत, तर फक्त ४ विद्यमान खासदार आहेत. लोकसभा निवडणुकीपूर्वी देशात राज्यसभेच्या ५६ जागांवर निवडणुका होत आहेत. ५६ जागांसाठी भाजपने २८ उमेदवार जाहीर केले आहेत. यातील २४ चेहरे नवीन आहेत, तर केवळ ४ विद्यमान खासदारांना पुन्हा उमेदवारी देण्यात आली आहे. विशेष म्हणजे राज्यसभेतून मोदी सरकारमध्ये मंत्री झालेल्या ७ नेत्यांना या वेळी उमेदवारी देण्यात आलेली नाही. यामधून मागच्या दाराने येणाऱ्यांसाठी मंत्रिमंडळाचे दरवाजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बंद केले असल्याचे दिसत आहे.

'या' सात जणांना देणार लोकसभेची उमेदवारी

केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान, आरोग्यमंत्री मनसुख मांडविया, कामगार आणि पर्यावरण तसेच वनमंत्री भूपेंद्र यादव, माहिती तंत्रज्ञान राज्यमंत्री राजीव चंद्रशेखर, पशुसंवर्धन आणि मत्स्यव्यवसाय मंत्री पुरुषोत्तम रुपाला, मध्यम, लघू आणि सूक्ष्म उद्योगमंत्री नारायण राणे, परराष्ट्र राज्यमंत्री व्ही. मुरलीधरन या सात जणांना राज्यसभेची उमेदवारी न देता लोकसभेची उमेदवारी देण्यात येणार आहे. याशिवाय बिहारचे माजी उपमुख्यमंत्री सुशील मोदी, अनिल बलुनी आणि, राष्ट्रीय उपाध्यक्ष सरोज पांडे यांचीही राज्यसभेसाठी निवड करण्यात आलेली नाही. त्यामुळे या नेत्यांना आता संसदेत जाण्यासाठी लोकसभेतून विजय मिळवावा लागणार हे स्पष्ट आहे.

जनतेसमोर नेतृत्व सिद्ध करावे लागणार

केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांना ओडिशातून, गुजरातमधून आरोग्यमंत्री मनसुख मांडविया, केरळमधून पीयूष गोयल, हरियाणा किंवा राजस्थानच्या कोणत्याही एका जागेवरून भूपेंद्र यादव, कर्नाटक किंवा दिल्ली येथून परराष्ट्र मंत्री एस जयशंकर, याशिवाय सूक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे  यांनाही महाराष्ट्रातील एका जागेवरून लोकसभा निवडणूक लढवण्यास सांगितले जाण्याची शक्यता आहे.

गेल्या वर्षीच केली होती घोषणा

राज्यसभेच्या खासदारांबाबत गेल्या वर्षीचे पंतप्रधान नरेंद्र मोदी  यांनीच असे संकेत दिले होते. एनडीएच्या खासदारांच्या बैठकीत पीएम मोदी यांनी 'प्रत्येक राज्यसभा खासदाराने किमान एक लोकसभा निवडणूक लढवावी, जेणेकरून त्यांना निवडणुकीचा अनुभव घेता येईल, असे म्हटले होते. राज्यसभेतील खासदार त्यांची आवडती लोकसभेची जागा निवडू शकतात, असा संदेशही पक्षांतर्गत पाठवण्यात आला आहे.