Sangli Samachar

The Janshakti News

गुढता निर्माण करणारी भारतातील पर्यटन स्थळे... जिथे विज्ञानही टेकले हात !

 


सांगली समाचार - दि. १८|०२|२०२४

मुंबई - भारतात अशी अनेक ट्रॅव्हल डेस्टिनेशन आहेत, जिथे परदेशी लोकही आवर्जून भेट देतात. ही ठिकाणं सौंदर्याच्या बाबतीत इतर देशांना मागे टाकतात. यासोबत भारतात अशी अनेक ठिकाणे आहेत ज्यांचे रहस्य विज्ञानालाही समजलेले नाही. 

या ठिकाणांच्या स्टोरी ऐकल्यावर तुमचा विश्वास बसणार नाही. या यादीमध्ये अनेक ऐतिहासिक स्थळांच्या नावांचा समावेश आहे. आज आम्ही तुम्हाला भारतातील या रहस्यमय ठिकाणांबद्दल सांगणार आहोत, ज्यांमधील रहस्य अगदी विज्ञानही सोडवू शकलेले नाही. चला अशा ट्रॅव्हल डेस्टिनेशबद्दल जाणून घेऊयात.

भानगड किल्ला

जयपूरपासून ३२ मैल दूर असलेला राजस्थानचा भानगड किल्ला खूप प्रसिद्ध आहे. या किल्ल्याशी अनेक भूत-प्रेत कथा निगडित आहेत. १७ व्या शतकापासून हा किल्ला पछाडलेला असल्याचे सांगितले जाते. आजही लोकांचा असा विश्वास आहे की येथे भूत आणि पिशाच राहतात.

लेपाक्षी मंदिर

देशाचे दक्षिणेकडील राज्य म्हणजे आंध्र प्रदेशचे लेपाक्षी मंदिर अतिशय रहस्यमय आहे. हे मंदिर १६व्या शतकात बांधले गेले होते. या मंदिरात तब्बल ७० खांब आहेत. पण इथे असा एक खांब देखील आहे, जो छताच्या मदतीने हवेत लटकत राहतो.

अजिंठा-एलोरा लेणी

महाराष्ट्रातील प्रसिद्ध अजिंठा एलोरा लेणी देखील खूप रहस्यमय मानली जातात. या लेण्यांचा इतिहास ४ हजार वर्षे जुना असल्याचे मानले जाते. अजिंठा येथे सुमारे ३० आणि एलोरामध्ये १२ लेणी आहेत. या खडकाच्या खाली एक शहर देखील वसले आहे असे म्हणतात. डोंगर कापून या गुहा बनवल्या गेल्या होत्या, पण त्यावेळी यंत्रसामग्री नव्हती.

रूपकुंड तलाव

उत्तराखंडच्या या सरोवराविषयी जो कोणी ऐकतो, त्याच्यासमोर मानवी सांगाडे घुमू लागतात. रूपकुंड तलाव हे उत्तराखंडमधील सर्वात प्रसिद्ध तलाव आहे. जमिनीपासून या तलावाची उंची ५०२९ मीटर आहे. या तलावाभोवती अनेक मानवी सांगाडे दिसतील.