Sangli Samachar

The Janshakti News

मार्चनंतर सरकारी कर्मचाऱ्यांचा खिसा किती गरम होणार ?


सांगली समाचार - दि. २१|०२|२०२४

नवी दिल्ली - मार्च महिना आला की, सरकारी कर्मचाऱ्यात चर्चा सुरू होते, सॅलरी किती वाढणार आणि महागाई भत्ता किती मिळणार ? एका वृत्तानुसार केंद्र सरकार मार्चमध्ये चार टक्के महागाई भत्त्यात वाढ करण्याची शक्यता आहे. औद्योगिक कामगारांच्या ग्राहक किंमत निर्देशकांची बारा महिन्याची सरासरी ३९२.८३ इतकी आहे. महागाई भत्ता भत्ता वाढीचे प्रमाण, केंद्र सरकार अखिल भारतीय सीपीआय-आयडब्ल्यूच्या आकडेवारीच्या आधारे ठरवते. सरकारी कर्मचाऱ्यांना डीए दिला जातो, तर पेन्शनधारकांना बी आर दिला जातो. डीए आणि डीआर मध्ये वर्षातून दोनदा, जानेवारी आणि जुलै मध्ये वाढ केली जाते.

यापूर्वी ऑक्टोबर २०२३ मध्ये महागाई भत्ता चार टक्क्यांनी वाढ करून, ४६ % करण्यात आली होती. सध्याचा महागाई दर पाहता, पुढील महागाई भत्त्यात चार टक्के वाढ अपेक्षित आहे. अधिकृत आकडेवारीनुसार ४७.५८ लाख कर्मचारी आणि ६९.७६ लाख पेन्शनधारक आहेत. आगामी महागाई भत्ता वाढीनंतर खूप मोठा फायदा या कर्मचाऱ्यांना व पेन्शन धारकांना मिळणार आहे. त्यामुळे सर्वच कर्मचारी या निर्णयाच्या प्रत्यक्ष आहेत.