yuva MAharashtra राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार अल्पसंख्यांक सेल तर्फे पद वाटप कार्यक्रम संपन्न

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार अल्पसंख्यांक सेल तर्फे पद वाटप कार्यक्रम संपन्न

| सांगली समाचार वृत्त |
सांगली - सोमवार दि. १८ ऑगस्ट २०२५

 राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या अल्पसंख्यांक सेलतर्फे पदवाटप कार्यक्रम शहर जिल्हाध्यक्ष संजयजी बजाज यांच्या हस्ते पार पडला. या कार्यक्रमाचे आयोजन शहर जिल्हा अल्पसंख्यांक सेल अध्यक्ष आयुब भाई बारगीर यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले होते.

या प्रसंगी बोलताना आयुब भाई बारगीर म्हणाले, “आमदार जयंत पाटील साहेब यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस हा सर्वसामान्य व अल्पसंख्यांक समाजाच्या हितासाठी सतत कार्य करणारा पक्ष आहे. पुढील काळात संजयजी बजाज यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व जाती-धर्मांना एकत्र आणून पक्षवाढीसाठी तसेच जनतेच्या प्रश्नांच्या निवारणासाठी आम्ही काम करत राहणार आहोत.

यावेळी शहर जिल्हाध्यक्ष संजयजी बजाज म्हणाले, राष्ट्रवादी काँग्रेस हा सर्वसमावेशक विचारसरणीचा पक्ष आहे. आगामी महापालिका, जिल्हा परिषद व ग्रामपंचायत निवडणुकीत जयंत पाटील साहेब यांच्या नेतृत्वाखाली आम्ही जोरदारपणे लढणार आहोत. समाजातील विविध प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. आगामी महापालिकेत नव्या चेहऱ्यांना संधी देऊन पक्षाची ताकद वाढवली जाईल.

या कार्यक्रमात सांगली शहराध्यक्ष म्हणून असलम मुल्ला, तर शहर जिल्हा उपाध्यक्ष म्हणून अब्दुल शेख यांची निवड करण्यात आली.

शेवटी, कार्यकर्त्यांबद्दल कृतज्ञता व्यक्त करत आयुब भाई बारगीर म्हणाले की , “आज पक्षासाठी निष्ठेने काम करणारे कार्यकर्ते हा पक्षाचा कणा आहेत. त्याग आणि तळमळीने काम करणाऱ्या या कार्यकर्त्यांमुळेच पक्ष मजबूत झाला आहे. पुढे पक्षात येणाऱ्या नव्या पदाधिकाऱ्यांनीही हाच जोश आणि आत्मविश्वास जोपासून पक्षवाढीसाठी व जनतेच्या सेवेसाठी नेहमी तत्पर राहावं, हीच अपेक्षा आहे.”

या पद वाटप कार्यक्रमात पक्षाचे ज्येष्ठ नेते मुस्ताक भाई रांगरेज, कामगार सेल जिल्हाध्यक्ष विनायक आबा हेगडे, कार्याध्यक्ष इर्शाद भाई पखाली, उपाध्यक्ष अझरभाई सय्यद, कामगार सेलचे उपाध्यक्ष नितीन माने, अजीम मुलाणी , अल्पसंख्यांक सेल सचिव अंजर फकीर, युवक अध्यक्ष वाजिद खतीब, सांगली शहर युवक अध्यक्ष आश्रफ चाऊस, मिरज शहर अध्यक्ष वाहिद खतीब,अमित चव्हाण, उपाध्यक्ष हाफिज इरफान भाई, सोहेल कोकणे, इम्रान पठाण, राहील मुल्ला, आदी मान्यवर व कार्यकर्ते उपस्थित होते.