yuva MAharashtra “चिंतामणराव कॉलेज परिसरात अतिक्रमण कायम; विशेष सवलत की खास दर्जा?”

“चिंतामणराव कॉलेज परिसरात अतिक्रमण कायम; विशेष सवलत की खास दर्जा?”

| सांगली समाचार वृत्त |
सांगली - बुधवार दि. २० ऑगस्ट २०२५

सांगली – शहराच्या मध्यवर्ती सांगली–मिरज मार्गावर दिवसरात्र वाहनांचा राबता सुरू असतो. या मार्गालगत मार्केट यार्ड, महाविद्यालये, भारती हॉस्पिटल, जिल्हाधिकारी कार्यालय आणि जिल्हा न्यायालय अशी महत्त्वाची केंद्रे असल्याने सततची गर्दी टाळणे अशक्यच.

महापालिकेने पुष्पराज चौक ते महात्मा गांधी चौक दरम्यानचा रस्ता नो हॉकर्स झोन म्हणून घोषित करून वारंवार अतिक्रमण हटाव मोहिमा केल्या आहेत. तरीही विजयनगर चौकापर्यंतच्या रस्त्यावर फुटपाथ व्यापाऱ्यांची दादागिरी कायम आहे. अतिक्रमणामुळे वाहतूक कोंडी व अपघातांची मालिका सुरूच असून सामान्य नागरिकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे.

सर्वसामान्य दुकानांना हटवले जात असताना, चिंतामणराव व्यापार महाविद्यालयाजवळील फळ विक्रेता व चहा टपरी मात्र प्रत्येक वेळी हटाव कारवाईतून सुटतात, हा योगायोग की जाणीवपूर्वक दिलेला ‘विशेष सन्मान’ असा प्रश्न नागरिकांमध्ये चर्चेचा विषय बनला आहे.

अतिक्रमणामुळे अडचणीत सापडलेल्या वाहनधारकांचा थेट सवाल – “या व्यापाऱ्यांना काय सरकारी जावयांचा दर्जा दिला आहे का?”