yuva MAharashtra जयसिंगपूर येथे सफल झाले. नेत्रदान तसेच त्वचा दान

जयसिंगपूर येथे सफल झाले. नेत्रदान तसेच त्वचा दान

| सांगली समाचार वृत्त |
जयसिंगपूर - बुधवार दि. २० ऑगस्ट २०२५

अवयव दानासाठी प्रेरित झालेल्या जयसिंगपूर मधील अनेक नागरिकांपैकी, पाटील कुटुंबीयांनी, श्रीमती वत्सला विजयकुमार पाटील (वय 83) यांचे नेत्रदान तसेच त्वचा दान करण्याचे ठरवले. 

दिनांक 18 ऑगस्ट 2025 रोजी अल्पशा आजाराने श्रीमती वत्सला विजयकुमार पाटील यांचा मृत्यू झाला. त्याआधी त्यांनी जैन धर्मानुसार सल्लेखना घेतली होती. त्यांची कन्या पद्मजा सुनील खोत यांनी जागरूकपणे नेत्रदान आणि त्वचा दानासाठी आईच्या इच्छा नुसार , फेडरेशन ऑफ ऑर्गण अंड बोडी डोनेशन च्या सांगली जिल्हा कोर्डीनेटर डॉ.हेमा चौधरी यांच्याशी संपर्क साधून सर्व माहिती आईच्या मृत्यू आधीच करून घेतली होती. 

सौ. वत्सला पाटील यांच्या मृत्यू पश्चात त्यांचा मुलगा सुनील विजयकुमार पाटील मुली पद्मजा सुनील खोत आणि तेजश्री संजय वडगावे यांनी सामाजिक जाणीव ठेवून स्वतःच्या आईचे नेत्रदान तसेच त्वचा दान करायचे ठरवले. यांनी ताबडतोब डॉक्टर हेमा चौधरी यांच्याशी संपर्क साधला. त्यांनी तत्पर हालचाली करत महादान सफल करवून घेतले. 

नेत्रदान नंदादीप आय बँकेने स्वीकारले. तसेच त्वचा दान कै कलावती पटवर्धन रोटरी त्वचा बँक यांनी स्वीकारले दान यशस्वी होण्यासाठी डॉ. सुहास पाटील यांचा वाटा खूप मोठा आहे
   
महादानी श्रीमती वत्सला विजयकुमार पाटील यांच्या आत्म्यास शांती आणि संपूर्ण कुटुंबीयाला परमेश्वर आशीर्वाद देवो, अशी प्रार्थना करते. अत्यंत दुःखाच्या क्षणी असा निर्णय घेणे हे सर्वसाधारण लोकांचे काम नाही. समाजाने अशा कुटुंबीयांचा विशेष आदर करून त्यांना पाठिंबा कळवणे, हे जागृत समाजाचे कर्तव्य आहे असे मी मानते. 
            
- डॉक्टर हेमा चौधरी,
- दि फेडरेशन ऑफ ऑर्गन् अँड बॉडी डोनेशन, सांगली जिल्हा मुख्य को-ऑर्डिनेटर

The federation of Organ and Body Donation 9226991528