| सांगली समाचार वृत्त |
सांगली - मंगळवार दि. १७ जून २०२५
सांगली जिल्ह्यातील तिर्थंकर एज्युकेशन सोसायटी या ग्रामीण भागात कार्यरत असलेल्या शैक्षणिक संस्थेला ग्रामीण भागातील उत्कृष्ट शिक्षण संस्था म्हणून गौरवण्यात आलं आहे.
हा सन्मान दिनांक 14 जून रोजी मुंबई येथील ताज प्रेसिडेंट हॉटेल येथे पार पडलेल्या दैनिक नवभारत समूहाच्या पुरस्कार समारंभात करणेत आला. या भव्य सोहळ्यात महाराष्ट्र राज्याचे माहिती तंत्रज्ञान आणि सांस्कृतिक कार्य मंत्री नामदार आशिष शेलार, उत्तर प्रदेशचे उच्च शिक्षण मंत्री नामदार आशिष सिंग पटेल, मेघाश्रय सामाजिक संस्थेच्या प्रमुख सीमा सिंग, आणि नवभारत वृत्तपत्राचे प्रमुख वैभव माहेश्वरी यांची प्रमुख उपस्थिती होती.
तिर्थंकर एज्युकेशन सोसायटीच्या वतीने, संस्थेचे चेअरमन श्री. रावसाहेब पाटील, संस्थापक प्रा. डी. डी. चौगुले, प्राचार्य डॉ. किरण वाडकर व सर्व संचालक यांच्या मार्गदर्शनाखाली प्रा. दिपक भिंगारदेवे आणि प्रा. गजानन पाटील यांनी हा पुरस्कार स्वीकारला.
या सन्मानामुळे ग्रामीण भागातील गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी झटणाऱ्या संस्थांची प्रेरणा वाढली असून, तिर्थंकर एज्युकेशन सोसायटीने एक नवा आदर्श निर्माण केला आहे.