yuva MAharashtra पत्रकार नगर रोडवर घाडगे पाटील शोरूम शेजारी भाजी विक्रेत्याचा पूर्ववैमनस्यातून निर्घृण खून

पत्रकार नगर रोडवर घाडगे पाटील शोरूम शेजारी भाजी विक्रेत्याचा पूर्ववैमनस्यातून निर्घृण खून


| सांगली समाचार वृत्त |
सांगली - गुरुवार दि. ५ जून २०२५

सांगली शहरात खूनाची मालिका थांबण्याचे नाव घेत नाही. आज सकाळी पत्रकार नगर रोडवर घाडगे पाटील शोरूम शेजारी एका भाजी विक्रेत्याचा धारदार हत्याराने वार करून निर्घृण खून करण्यात आला. महेश प्रकाश कांबळे (रा. इंदिरानगर सांगली) असे या खून झालेल्या भाजीविक्रेत्याचे नाव आहे.

आज सकाळी नेहमीप्रमाणे शंभर फुटीवरील बाजारात भाजी विक्रीसाठी आला होता. यावेळी दोन इसम तेथे आले आणि त्यांनी महेश कांबळे याच्यावर कोयत्याने सपासप वार केले. घाव वर्मी लागल्याने कांबळे याचा जागेवरच मृत्यू झाला.

महेश कांबळे याच्यावर 2021 साली फिरोज उर्फ बडे शेख याचा खून केल्याचा गुन्हा विश्रामबाग पोलीस ठाण्यात नोंद आहे. या प्रकरणातूनच महेश कांबळे याचा खून झाल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. सांगली शहर पोलीस या प्रकरणाचा कसून तपास करीत आहेत.

/