yuva MAharashtra बँक ऑफ महाराष्ट्रसह पाच बँकांना RBI कडून दंड, नियमभंगामुळे कठोर कारवाई !

बँक ऑफ महाराष्ट्रसह पाच बँकांना RBI कडून दंड, नियमभंगामुळे कठोर कारवाई !


| सांगली समाचार वृत्त |
नवी दिल्ली - दि. ५ मे २०२५

देशातील बँकिंग प्रणालीवर देखरेख ठेवणाऱ्या रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) अलीकडेच एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. या निर्णयाअंतर्गत बँक ऑफ महाराष्ट्रसह इतर चार नामांकित बँकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. बँकांनी आरबीआयच्या नियमांचे उल्लंघन केल्यामुळे ही कारवाई झाली आहे.

या बँकांवर कारवाई का झाली ?

RBI ने आपल्या अधिकृत पत्रकात दिलेल्या माहितीनुसार, या बँकांनी KYC, सायबर सुरक्षा, ग्राहक सेवा, तसेच अन्य नियामक निर्देशांचे पालन न केल्याचे आढळून आले. त्यामुळे संबंधित बँकांवर आर्थिक दंड आकारण्यात आला आहे.

दंडित झालेल्या बँकांची यादी आणि कारणे:

1. ICICI बँक – ₹97.20 लाखांचा दंड, सायबर सुरक्षा, केवायसी आणि कार्डशी संबंधित नियमांचे उल्लंघन.


2. Axis बँक – ₹29.60 लाखांचा दंड, ऑफिस खात्यांच्या गैरप्रकारांमुळे.


3. IDBI बँक – ₹31.80 लाखांचा दंड, किसान क्रेडिट कार्ड अनुदान प्रक्रियेतील त्रुटी.


4. बँक ऑफ बडोदा – ₹61.40 लाखांचा दंड, ग्राहक सेवा आणि वित्तीय सेवा नियमभंगामुळे.


5. बँक ऑफ महाराष्ट्र – ₹31.80 लाखांचा दंड, केवायसी निर्देशांचे उल्लंघन.



ग्राहकांवर याचा परिणाम होणार का ?

या दंडात्मक कारवायांचा थेट परिणाम ग्राहकांवर होणार नाही. आरबीआयची ही पावले केवळ बँकांच्या कारभारातील शिस्त राखण्यासाठी आहेत. त्यामुळे खातेदारांनी कोणतीही चिंता करण्याचे कारण नाही.