| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. १२ मे २०२५
हिराबाग मधून जल भवन, व विश्रामबाग टाकीला जाणाऱ्या ७५ एचपी पंप नादुरुस्त झाला आहे त्याऐवजी ७० एचपी चा पर्यायी जुना पंप चालू करण्यात येणार आहे. सदर पंपाचा डिस्चार्ज थोडा कमी आहे, त्या कारणाने काही भागात अपुरा पाणी पुरवठा होणार आहे.
चांदणी चौक, जल भवन परिसर, धामणी रोड, दत्तनगर व गणपती मंदिर, वालचंद कॉलेज इत्यादी भागात उद्यापासून तीन दिवस अपुरा पाणीपुरवठा होणार आहे .अशी माहिती कार्य अभियंता श्री कुरणे यांनी दिली आहे.
पंप दुरुतीचे काम हाती घेतले आहे, तरी नागरिकांनी सहकार्य करावे असे अहवान कार्यकारी अभियंता पाणी पुरवठा विभाग यांनी केले आहे.