yuva MAharashtra राज्यात प्रथमच रुग्ण हिताकरिता बैठक घेतल्याबद्दल आरोग्य हक्क समितीच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांचे अभिनंदन !

राज्यात प्रथमच रुग्ण हिताकरिता बैठक घेतल्याबद्दल आरोग्य हक्क समितीच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांचे अभिनंदन !


| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. १८ एप्रिल २०२५

धर्मादाय रुग्णालयांनी उच्च न्यायालयाचे आदेशाचे व नियमांचे काटेकोर पालन करावे. रुग्णालयाने सकारात्मक प्रतिमा तयार करावी. या ज्वलंत विषयावर राज्यात सर्वप्रथम रुग्णहिताकरिता बैठक आयोजित केल्याबद्दल आरोग्य हक्क समितीच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांचे अभिनंदन करून, निवेदन सादर करण्यात आले. 


सर्व हॉस्पिटलनी रुग्णहक्काची सनद ठळक अक्षरात दिसेल अशी दर्शनी भागात लावावी, महाराष्ट्र नर्सिंग होम रजिस्ट्रेशन ऍक्ट 2021 ॲक्टची काटेकोर अंमलबजावणी करावी, हॉस्पिटलच्या मेडिकल मधून औषध घेण्याची सक्ती नाही, अशा आशयाचे फलक लावावेत. रुग्णांना सन्मानाची वागणूक द्यावी. म. ज्योतिराव फुले जीवनदायी योजना व धर्मादाय हॉस्पिटलच्या संदर्भातील उच्च न्यायालयाच्या आदेशाची गल्लत करू नये. याकरिता धर्मादाय कार्यालय व फुले योजना यांच्यात समन्वय असावे. असे निवेदनात नमूद केले आहे. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. शिष्टमंडळाचे नेतृत्व अध्यक्ष शाहीन शेख, प्रमोद माळी, पै. प्रदीप उर्फ चंदू पाटील, सुमित कांबळे, दादासाहेब कांबळे, यांनी केले.