| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. २२ एप्रिल २०२५
आज आपत्ती व्यवस्थापन केंद्र मंगलधाम येथे मा आयुक्त सत्यम गांधी यांनी भेट दिली.
या वेळी आपत्ती व्यवस्थापन बाबतची sop बाबत सादरीकरण करण्यात आले, प्रमोद रजपूत अधीक्षक आपत्ती व्यवस्थापन कक्ष यांनी माहिती सांगितली. तर अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ यांनी सन २०१९ मध्ये आलेल्या महापूर आणि मनपा वतीने केलेल्या कार्यवाही बाबत सविस्तरपणे माहिती या वेळी सांगितली.
आपत्ती व्यवस्थापन अंतर्गत मान्सूनपूर्व तयारी बाबत या वेळी विभाग प्रमुख यांनी माहिती दिली. शहर अभियंता पृथ्वीराज चव्हाण यांनी पावसाळीपूर्व आणि नंतर करावयाच्या कार्यवाही बाबत माहिती दिली. मनपा पॅनल वरील आर्किटेक्चर यांच्याकडून मनपाच्या शाळा, मनपाच्या इमारती इत्यादींचा स्ट्रक्चरल ऑडिट करून घेण्यात येणार आहे.
प्रभाग समिती निहाय धोकादायक इमारती बाबत पाहणी करून नोटीस बजावण्यात येत आहे. येत्या ८ दिवसात नाले सफाई निविदा प्रक्रिया पूर्ण होईल. दरम्यान छोटे नाले स्वच्छता करण्याची कार्यवाही सत्वर करण्यात येणार आहे, अशी माहिती डॉ. रवींद्र ताटे यांनी दिली आहे,
१५ मे पूर्वी तिन्ही शहरातील छोट्या गटारी स्वछता मोहीम हाती घेऊन नियोजन उद्या सादर करण्याचे आदेश मा आयुक्त यांनी दिले आहेत. मोकळ्या जागा स्वच्छता, परिसर स्वच्छता, इत्यादी बाबत नियोजन करण्यात आले आहे,
पाणी पुरवठा, जलनिसरण,इत्यादी बाबत मान्सून पूर्व तयारी बाबत माहिती कार्यकारी अभियंता कुरणे यांनी दिली. तसेच विद्युत विभागाकडील माहिती कार्यकारी अभियंता विद्युत अमर चव्हाण यांनी दिली
अग्निशमन दलाच्या सद्य स्थितीबाबत माहिती मुख्य अग्निशमन अधिकारी सुनील माळी यांनी दिली. या मध्ये बोटी, आपत्ती साठी प्रशिक्षण इत्यादी बाबत माहिती दिली.
मान्सूनपूर्व तयारी बाबत डॉ. वैभव पाटील यांनी दवाखाना आणि औषध बाबत माहिती सविस्तर माहिती दिली. मा. आयुक्त यांनी सर्व विभागाची माहिती घेतली. आपत्ती व्यवस्थापन बाबत सविस्तरपणे आढावा मा आयुक्त लवकरचं घेणार आहेत,
या वेळी अति आयुक्त रविकांत अडसूळ, उप आयुक्त स्मृती पाटील, वैभव साबळे, विजया यादव, शिल्पा दरेकर, शहर अभियंता पृथ्वीराज चव्हाण, सहा आयुक्त, विविध खाते प्रमुख या वेळी उपस्थित होते.