yuva MAharashtra सांगली येथे भगवान महावीर जन्मकल्याणक महोत्सव निमित्त भव्य शोभायात्रा !

सांगली येथे भगवान महावीर जन्मकल्याणक महोत्सव निमित्त भव्य शोभायात्रा !


| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. १० एप्रिल २०२५

सांगली: "अहिंसा परमो धर्म" हा संदेश देणारे २४ वे तिर्थंकर भगवान महावीर यांच्या २६२४ व्या जन्मकल्यानकनिमित्त शहरात समस्त जैन समाजाचे वतीने भव्य शोभा यात्रा काढण्यात आली. समस्त जैन समाजाची सन १९३१ पासून एकत्रित शोभा यात्रा निघत आहे. यामध्ये दिगंबर, श्वेतांबर, तेरापंथी या सह जैन धर्मातील सर्व पंथीय श्रावक श्राविकांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला. भ. महावीर जन्मकल्याणक निमित्त सोमवार दि.०७ एप्रिल २०२५ रोजी भव्य खुल्या निबंध व वक्तृत्व स्पर्धा व दि. ०९ एप्रिल २०२५ रोजी सकाळी ०७:३० वा महिला रॅलीनंतर विश्व नमोकार दिनानिमीत्त णमोकार मंत्राचे जाप करण्यात आले. अमिझरा पार्श्वनाथ देहरासर ट्रस्ट व जैन सोशल ग्रुप यांनी कच्छी जैन भवन येथे आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरात २५० हून अधिक जणांनी रक्तदान केले. सकाळी ७:३० वाजता सुनितीन जैन भवन आमराई येथून शोभायात्रा सुरु झाली.

भगवान महावीर जन्मकल्याणक महोत्सवानिमित्त निघालेल्या या भव्य शोभा यात्रेत चित्ररथ, चांदीचे रथ याचा समावेश होता. या भव्य शोभा यात्रेत हजारो युवक, युवती, महिला व पुरुषांनी सहभाग घेतला. शेठ रा. घ. दावडा दिगंबर जैन बोर्डिंग मधील विदयार्थ्यांनी सोवळे परिधान करुन "भगवान महावीर" यांच्या जयघोषात शोभा यात्रेत सामील झाले. जैन महिलाश्रमचे विदयार्थीनी फेटे बांधुन झांजपथकासह भारतीय संस्कृतीचे दर्शन घडवत होते. जैन मंदिरात सकाळपासून दुग्धाभिषेक, पुजा अर्चा, इ. कार्यक्रम झाले. जैन कच्छी भवन येथील रक्तदान शिबिरासाठी सिध्दीविनायक, उषःकाल आणि एम एस आय इ. रक्तपेढी यांनी मदत केली. भगवान महावीर जन्मकल्याणक महोत्सवाच्या निमित्ताने सिव्हील हॉस्पिटल, वृद्धाश्रम, अनाथाश्रम, रिमांडहोम सावली निवारा केंद्र, येथे अन्नदान, फळवाटप आमि पार्श्व ग्रुप यांच्या सहकार्याने करण्यात आले. मिरवणुकीमध्ये सहभागी झालेल्या बंधु भगिनीना शहरातील व्यापारी बंधुनी पाणी, सरबत वाटपाचे नियोजन केले होते. तसेच शहरातील सर्व जैन मंदिरामध्ये भक्तीसंध्या आणि इतर सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये अनेक श्रावकांनी सहभाग नोंदवला.
या भव्य मिरवणुकीत शेठ रा. ध. दावडा दिगंबर जैन बोर्डिंग, भगवान नेमिनाथ दिगंबर जैन मंदिर, नेमिनाथनगर, भगवान पार्श्वनाथ दिगंबर जिनमंदिर, गावभाग, भगवान शांतिनाथ दिगंबर जिनमंदिर, दत्तनगर, भगवान पार्श्वनाथ दिगंबर जिनमंदिर, पार्श्वनाथनगर, पार्श्व पदमावती मंदिर, पदमावती कॉलनी धामणी रोड, श्रीमती कळंत्रेआक्का जैन श्राविकाश्रम, जैन श्वेतांबर तेरापंथी सभा, श्री. महावीर स्वामी जैन श्वेतांबर जैन मूर्ती पूजकसंघ, सांगली श्री, अमिझरा पार्श्वनाथ देहारासर ट्रस्ट, शत्रुंजय आदिश्वर जैन श्वेतांबर मूर्तीपूजक संघ, जैन श्वेतांबर स्थानकवासी संघ, अचलगच्छ जैन श्वेतांबर संघ या संघटनांचे सदस्य सहभागी झाले होते.

या भव्य मिरवणुकीत दक्षिण भारत जैन सभेचे अध्यक्ष भालचंद्र पाटील, चेअरमन रावसाहेब जि. पाटील, मुख्यमहामंत्री डॉ. अजित पाटील, माजी उपमहापौर प्रशांत पाटील (मजलेकर), श्वेतांबर समाजाचे अध्यक्ष सुभाष शहा, शांतिनाथ कांते, उदय पाटील जैन बोर्डिंग चेअरमन प्रा. राहुल चौगुले, सेक्रेटरी ॲड. मदन पाटील, शशिकांत राजोबा, जैन श्वेतांबर देहरासर मंदिर उपाध्यक्ष जतीन शहा, सेक्रेटरी रोहन मेहता, विलास शहा, महावीर भन्साली, विपुल मेहता, धीरज दोशी, रौनक शहा, अचलगच्छचे जयेश हरिया, परेश पासड, तसेच राजेश पाटील, प्रवीण वाडकर, श्री. शांतिनाथ नंदगांवे, जैन सोशल ग्रुपचे सुशांत शाह, प्रसन्न शहा, अतुल शहा, शंखेश्वर पार्श्वनाथ ट्रस्टचे तेजपाल शहा, मुकेश जैन, अजित संघवी, ॲड उल्हास चिपरे. श्रीमती कळत्रेआक्का जैन महिलाश्रमचे चेअरमन श्रीमती अनिता पाटील, सेक्रेटरी, श्रीमती छाया कुंभोजकर, महिला परिषद पदाधिकारी, सांगली शहरातील सर्व जैन मंदिरचे ट्रस्टी, सदस्य इ. उपस्थित होते. त्याचप्रमाणे निबंध व वक्तृत्व स्पधेचे संयोजन विशाल चौगुले, लीना छेडा, स्मिता दोशी, जयपाल चौगुले, विद्यासागर चौगुले यानी केले.

या मिरवणुकीमध्ये खा. विशाल पाटील, आमदार सुधीर गाडगीळ, माजी महापौर दिग्वीजय सुर्यवंशी, नगसेवक मंगेश चव्हाण, माजी नगर सेवक लक्ष्मण नवलाई तसेच सर्वच राजकीय पक्षातील नेत्यांनी हजेरी लावली.