| सांगली समाचार वृत्त |
मुंबई - दि. १५ एप्रिल २०२५
सांगली मिरज आणि कुपवाड महानगरपालिका अग्निशमन विभागाचे फायरमन श्री. कासाप्पा माने यांना उत्कृष्ट सेवा केल्याबद्दल १५ ऑगस्ट रोजी राष्ट्रपती पदक जाहीर झाले होते. मा.राज्यपाल महोदय महाराष्ट्र राज्य यांच्या शुभहस्ते राजभवन येथे प्रदान करण्यात आले.
महापालिका मध्ये अग्निशमन विभागात उत्कृष्ट सेवा केल्याबद्दल श्री माने यांना राष्ट्रपती पुरस्कार सन्मानित करण्यात आलेला आहे. मा. रविकांत अडसूळ आयुक्त यांनी श्री माने यांचे अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या.
मुख्य अग्निशमन अधिकारी सुनील माळी व अग्निशमन सेवा बजवणारे सर्व जवानाचे कौतुक करून उत्कृष्ट सेवा करण्याबाबत अपेक्षा व्यक्त करून सर्व जवानांना देखील शुभेच्छा मा आयुक्त यांनी दिल्या आहेत.