yuva MAharashtra डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त मनपा वतीने महास्वच्छता अभियान !

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त मनपा वतीने महास्वच्छता अभियान !


| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. १३ एप्रिल २०२५

डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त प्रभाग समिती निहाय स्वच्छता अभियान राबवून परिसर स्वच्छ करून घेतला आहे, जयंती निमित्त सर्व मनपा क्षेत्रातील परिसरातील स्वच्छता मोहीम हाती घेतली होती, ती यशस्वी राबविण्यात सर्वांनी सहभाग नोंदवला याच्या आनंद झाला असल्याची प्रतिक्रिया आयुक्त मा रविकांत अडसूळ यांनी व्यक्त केली आहे. 

मा रविकांत अडसूळ आयुक्त यांच्या नेतृत्वाखाली आज सर्व स्वच्छता निरीक्षक ,सहा आयुक्त यांनी खालील परिसरात महा स्वच्छता मोहीम हाती घेऊन परिसर स्वच्छ केला आहे. स्वच्छता ही सेवा अंतर्गत महापालिका कार्यक्षेत्र मध्ये एकूण बारा ठिकाणी विशेष स्वच्छता अभियान घेण्यात आले यामध्ये प्रामुख्याने डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या अनुषंगाने पुतळा परिसर व परिसर स्वच्छ करण्यात आले.

मा आयुक्त रविकांत अडसूळ व उपायुक्त स्मृती पाटील यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा सांगली या ठिकाणी पाहणी केली. सोबत डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती समितीचे अध्यक्ष सौ स्नेहलताई सावंत, श्री वीरेंद्र थोरात, श्री प्रफुल्ल ठोकळे , श्री कुदळे, डॉ नितीन गोंधळे इत्यादी मान्यवर उपस्थित होते .
पाहणी दरम्यान शहर अभियंता श्री पृथ्वीराज चव्हाण नगर अभियंता अप्पा हलकुडे,डॉ रवींद्र ताटे , शाखा अभियंता ऋतुराज यादव मुख्य स्वच्छता अधिकारी श्री अनिल पाटील वरिष्ठ स्वच्छता निरीक्षक श्री याकूब मद्रासी व सर्व स्वच्छता निरीक्षक मुकदम व कर्मचारी उपस्थित होते




एकूण बारा ठिकाणी स्वच्छता अभियानाचे आयोजन करण्यात आले होते व परिसर स्वच्छ करून एकूण एक टन इतका कचरा गोळा करण्यात आला आहे. त्या बरोबर कुपवाड आणि मिरज परिसर देखील पाहणी सहा आयुक्त यांनी केली आहे.

खालील प्रभाग समिती मधील मुख्य परिसर स्वच्छता करून घेतली आहे अशी माहिती डॉ रवींद्र ताटे यांनी दिली आहे. 

प्रभाग समिती क्र १ मधील
डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा संपुर्ण परिसर,बुध्द विहार, सिध्दार्थ परिसर विष्णूघाट,डॉ. बाबासाहेब आंबेडकर, शास्रीनगर
शांतीनगर, मद्रासी कॉलनी,गोसावी गल्ली, धनगर गल्ली

प्रभाग समिती क्र २ मध्ये

नवीन वसाहत, स्मृती भवन, भीम नगर,

प्रभाग समिती क्र ३मध्ये 

चिन्मय पार्कसमोर बुध्द विहार, संजयनगर परिसर,

प्रभाग समिती क्र ४मध्ये 

बुध्द विहार,वैरण बाजार,रेल्वे चाळ संपुर्ण परिसर
वरील ठिकाणानुसार सर्व स्वच्छता निरीक्षक यांनी सदर परिसरातील स्वच्छता केला आहे कचरा उठाव केला आहे . पावडर धुरळणी करूनऔषधा फवारणी इत्यादी कामे पुर्ण केली आहेत.