| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. २६ जानेवारी २०२५
सांगली महापालिकेचे आयुक्त शुभम गुप्ता यांनी सर्व सांगली मिरज आणि कुपवाड महापालिका क्षेत्रातील नागरिकांना, कर्मचारी अधिकारी यांना ७६ प्रजासत्ताक दिन शुभेच्छा दिल्या आहेत. कर्मचारी अधिकारी संबोधित करताना बोलत होते. २६ जानेवारी प्रजासत्ताक दिन हा भारताच्या इतिहासातील अत्यंत महत्वपूर्ण दिवस आहे. या दिवशी १९५० साली भारताने आपल्या संविधानाची अंमलबजावणी केली आणि भारताला एक प्रजासत्ताक देश म्हणून ओळख प्राप्त झाली आहे. या दिवशी देशाच्या स्वातंत्र्य संग्रामातील शहिदांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली आहे. त्याचबरोबर आपला संविधान, त्यात दिलेल्या हक्कांची आणि कर्तव्यांची महत्ता बाबत या वेळी आठवण करून दिली आहे.
मा आयुक्त यांनी या वेळी बोलताना सांगितले की, भारताने विविध आव्हानांचा सामना करून आपला विकास साधला आहे. आजही आपल्या विविधतेत एकता टिकवून ठेवत, आपल्या विविध संस्कृतींना आणि परंपरांना जपून आपण प्रगतीच्या मार्गावर चालत आहोत. आपल्या संविधानाने दिलेल्या मूलभूत हक्कांच्या आधारे, आम्ही एक स्वतंत्र आणि समान समाज निर्माण करत आहोत, जेथे प्रत्येक नागरिकाला न्याय, स्वतंत्रता आणि बंधुता प्राप्त होणार आहे. महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्रात विविध विकास कामे हाती घेण्याकरीता महानगरपालिका क्षेत्रातील नागरिकांच्या आवश्यक असणाऱ्या सुविधांसाठी आवश्यक कामे सूचविण्याचे आवाहन करण्यात आले होते. त्यानुसार बऱ्याच नागरिकांनी कामे सूचविली आहेत. लोकाभिमुख अर्थसंकल्प करण्याकरीता सदर कामांचा प्राधान्याने विचार करुन सन २०२५-२६ च्या अर्थसंकल्पात तरतूद करून त्यांची कामे मार्गी लावण्यात येणार असल्याचे नमूद केले आहे.
खालील लिंकवर शुभम गुप्ता यांचे संपूर्ण भाषण !
महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांना वैद्यकीय सेवेमध्ये आर्थिक मदत व्हावी यास्तव Accidental Insurance, Hospital Charges, Education Insurance या सारख्या सुविधा देण्याचा महापालिकेने नियोजन केले असून त्या मुळे कर्मचाऱ्याऱ्यांमध्ये आर्थिक सुरक्षिततेची भावना निर्माण होणार आहे. एक नाविन्यपूर्ण उपक्रम मनपा वतीने राबविण्यात येणार आहे.
मा मुख्यमंत्री महोदय यांच्या १०० दिवसांच्या ७,कलमी उपक्रम अंतर्गत कार्यक्रमाची अंमलबजावणीकरीता विविध संस्था, NGOs, मंडळे यांच्यामार्फत मनपा क्षेत्रातील खुले भूखंड विकसित करण्यासाठी मनपाच्या मालमत्ता व्यवस्थापन विभागामार्फत खुल भूखंड विकसित व सुशोभिकरणाच्या स्पर्धा घेण्यात येणार आहेत, त्याचे अर्ज आणि माहिती मनपाच्या मालमता विभाग मध्ये उपलब्ध होणार आहे. यामध्ये प्रथम येणाऱ्यास र.रु. ५ लक्ष, द्वितीय क्रमांकास रु. २ लक्ष, तृतीय क्रमांकास रु.१ लक्ष तसेच उत्तेजनार्थ व इतर खास पारितोषिके देण्यात येणार आहेत.
मनपा क्षेत्रातील नागरिकांसाठी २६ जानेवारी प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून महानगरपालिका क्षेत्रातील नागरिकांना देण्यात येणाऱ्या सेवापैकी ४३ सेवा ह्या या नागरिकांना घरबसल्या देण्यासाठी आज ऑनलाईन प्रणाली अनावरण करण्यात येणार आहे. महानगरपालिका घनकचरा व्यवस्थापनाकडे काम करणारे सफाई कर्मचारी, मुकादम व स्वच्छता निरीक्षक यांना प्रत्येकी २ गणवेश व इतर सेफ्टी किट देण्याचे निश्चित केले आहे. तसेच सर्व शिपाई व वाहनचालक गणवेश उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
महानगरपालिका आयुक्तांनी दिलेल्या निर्देशानुसार मनपा क्षेत्रामध्ये सिंगल युज प्लॉस्टिकचा वापर करणाऱ्या व्यापाऱ्यांच्यावर दंडात्मक कारवाई करुन या आर्थिक वर्षात आरोग्य विभागाने रु. २१ लक्ष वसूल केले आहेत याबद्दल त्यांचे अभिनंदन मा आयुक्त यांनी केले आहे.
कचरा मुक्त परिसर साठी कचरा ठिकाणे आता होणार सेल्फी पॉईंट !
महानगरपालिका क्षेत्र कचरामुक्त करण्यासाठी मनपा क्षेत्रातील १३ Garbage Vulnerable Points (GVP)
कचरा मुक्त करून त्याठिकाणी सेल्फी पाईंट तयार करण्यात आले आहेत. महानगरपालिका क्षेत्रातील पाणी पुरवठा गळती व भूमिगत गटार चोकअप काढण्यासाठी र.५कोटी ७७लाख किमतीचे अद्यावत तंत्रज्ञानाचे रोबोट खरेदी करण्यात आले आहे. त्याद्वारे पाणीपुरवठा व्यवस्थेच्या व भूमिगत गटार पाईप लाईन्सची तपासणी करण्यात येणार आहे. सदर टेक्नॉलॉजीमुळे जीवित हानी न होता काम जलद गतीने होण्यास मदत होणार आहे,असे या वेळी मा आयुक्त यांनी सांगितले आहे.
प्रजासत्ताक दिनाच्या या ऐतिहासिक दिवशी, मा आयुक्त शुभम गुप्ता यांनी सर्व कर्मचारी अधिकारी यांना आपल्या कर्तव्यांची आणि जबाबदाऱ्यांची जाणीव करून देऊन महानगरपालिकेच्या प्रत्येक अधिकारी / कर्मचाऱ्यांने आपले काम प्रामाणिकपणे, निष्ठेने व सचोटीने पूर्ण केले पाहिजे, आणि, नागरिकांनी आपल्या कर्तव्यातून समाज हिताची जाणीव ठेवून पुढे यावे. आपण सर्वांनी एकजुटीने देशाच्या प्रगतीसाठी आणि शहराच्या विकासासाठी कार्य केले तरच आपण खऱ्या अर्थाने प्रजासत्ताक दिनाचे मोल जाणू शकतो.असे नमूद केले आहे.
या वेळी अति आयुक्त रविकांत अडसूळ ,उप आयुक्त वैभव साबळे ,विजया यादव ,मुख्य लेखा परीक्षक शिरीष धनवे ,मुख्य लेखा पाल अभिजित मंगडे ,सहा आयुक्त आकाश डोईफोडे , डॉ प्रज्ञा त्रिभुवन ,नकुल जकाते ,दिनेश जाधव जन संपर्क अधिकारी धनजय हर्षद ,कार्यकारी अभियंता कुरणे सुनील पाटील ,सर्व अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.