yuva MAharashtra 'छावा'तील 'ती' दृश्ये बदलणार? उदयनराजेंनी थेट फोन केल्यावर दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर यांचा खुलासा !

'छावा'तील 'ती' दृश्ये बदलणार? उदयनराजेंनी थेट फोन केल्यावर दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर यांचा खुलासा !


| सांगली समाचार वृत्त |
मुंबई - दि. २६ जानेवारी २०२५

विकी कौशल आणि रश्मिका मंदाना यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या बहुप्रतिक्षीत चित्रपट “छावा”चा ट्रेलर २२ जानेवारीला रिलीज झाला. मात्र, या ट्रेलरमध्ये छत्रपती संभाजी महाराज आणि महाराणी येसूबाई यांचा एकत्र नृत्य करताना दाखवलेला सीन वादाचा कारण ठरला आहे. अनेक संघटनांनी या दृश्यावर नाराजी व्यक्त केली असून, माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनीही या दृश्यावर शंका उपस्थित केली आहे.


उदयनराजे भोसले यांनी या वादावर चित्रपटाचे दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर यांना फोन केला आणि त्या दृश्यात बदल करण्याची सुचवणूक केली. त्यांनी सांगितले की, चित्रपटाच्या दिग्दर्शनाची सराहना केली असली तरी, इतिहासतज्ज्ञांचा सल्ला घेतल्यास वाद टाळता येईल. उतेकर यांनी सकारात्मक प्रतिसाद देत आवश्यक बदल करण्याचे आश्वासन दिले आहे.

मंत्री उदय सामंत यांनीही या वादावर प्रतिक्रिया दिली असून, त्यांनी चित्रपट प्रदर्शित होण्याआधी तज्ज्ञांद्वारे तपासणी करण्याची मागणी केली आहे. त्यांचा असा ठाम विश्वास आहे की, छत्रपतींचा इतिहास योग्य पद्धतीने सादर केला पाहिजे आणि कुठेही त्यांच्या सन्मानाला धक्का पोहोचू नये.

सर्व संबंधितांनी या वादावर योग्य निर्णय घेतल्यावरच चित्रपट प्रदर्शित करण्याची शिफारस केली आहे.