yuva MAharashtra ५२ वे सांगली जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचा समारोप व पारितोषिक वितरण समारंभ संपन्न !

५२ वे सांगली जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचा समारोप व पारितोषिक वितरण समारंभ संपन्न !


| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. १३ जानेवारी २०२५
सांगली जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचा समारोप व पारितोषिक वितरण समारंभ महावीर स्टेट अकॅडमी कशी बेडिज या ठिकाणी शनिवार दिनांक 11 जानेवारी 2025 रोजी मोठ्या उत्साहात पार पडला.

प्रथम सर्व मान्यवरांच्या हस्ते डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेषा अभिवादन करून, झाडाच्या रोपट्यास पाणी घालून कार्यक्रमाची सुरुवात झाली. समारोपाच्या कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक गीता शेंडगे उपशिक्षणाधिकारी तथा विज्ञान पर्यवेक्षक जि. प. सांगली यांनी केले. यानंतर कार्यक्रमाचे अध्यक्ष व सर्व प्रमुख पाहुणे व मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.

यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष रावसाहेब पाटील अध्यक्ष, तीर्थकर एज्युकेशन सोसायटी कसबे डिग्रज ता. मिरज, विज्ञान आणि तंत्रज्ञान यांची जोपासना केली पाहिजे असे आवाहन सहभागी विद्यार्थी विद्यार्थिनींना केले.


माननीय श्री धन्यकुमार चौगुले, संस्थापक तीर्थकर एज्युकेशन सोसायटी, कसबे डिग्रज यांनी वनस्पती, प्राणी ,मानव यांच्या जीवनाचे सार त्याच पद्धतीने अध्यात्म व विज्ञान यांची सांगड घालून आपण विज्ञानाचा कसा वापर केला पाहिजे हे सर्व योग्य पद्धतीने स्पष्टीकरण देऊन समजावून सांगितले.

 राजेसाहेब लोंढे, शिक्षण अधिकारी,जि प सांगली माध्यमिक यांनी, विद्यार्थी व शिक्षक यांच्यामध्ये आदर्श नाते असावे विद्यार्थ्यांना वैज्ञानिक जाणीवांची माहिती करून द्यावी प्रत्येकाने आपले काम योग्य पद्धतीने केले तर कोणतीही अडचणी निर्माण होणार नाही असे प्रतिपादन केले. सर्व सहभागी विद्यार्थी विद्यार्थिनींच्या उपकरणासाठी विजेत्यांचे अभिनंदन करून सर्वांना राज्यस्तरासाठी शुभेच्छा दिल्या.

सर्व मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण कार्यक्रम संपन्न झाला प्राथमिक विद्यार्थी, माध्यमिक विद्यार्थी, दिव्यांग विद्यार्थी, प्राथमिक माध्यमिक शिक्षक प्रयोगशाळा परिचर, असे एकूण 101 उपकरणे जिल्हास्तरीय प्रदर्शनासाठी सहभागी झाले होते. राज्यस्तरासाठी 11 शैक्षणिक साहित्याची निवड झालेली आहे.

 यावेळी या समारंभास नरेंद्र माळी, अधीक्षक जि. प.सांगली, संजय पाटील, अध्यक्ष विज्ञान गणित अध्यापक संघ सांगली, सिद्धराज चिकलगी, शिक्षणाधिकारी मिरज, संजय मस्कली, मुख्याध्यापक महावीर स्टेट अकॅडमी कसबे डिग्रज, वंदना शिरोटे, उपमुख्याध्यापिका 
बी आर पाटील, देवेंद्र पाटील, सुहास दळवी, तानाजी हराळे केंद्रप्रमुख, अनुराधा जंगम मॅडम, मधुकर सोनुरे, दत्तात्रेय वरदे, विजया जाधव, अरमान मुजावर, शोभा लोंढे, जुबेर पटेल, प्रज्ञा पाटील, सर्व सांगली जिल्हा विज्ञान गणित अध्यापक संघाचे सदस्य व नियोजन कमिटीचे सदस्य यांनी अतिशय नीटनेटके संयोजन केले व विज्ञान प्रदर्शन यशस्वी करण्यासाठी सहकार्य केले .

कार्यक्रमास सर्व विज्ञान शिक्षक शिक्षिका सहभागी विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. शेवटी आभार संजय पाटील सर यांनी मांडले