yuva MAharashtra महावीर उद्यानामध्ये सूचना निवारण प्रणालीचे आमदार सुधीर दादा गाडगीळ यांचे हस्ते लोकार्पण !

महावीर उद्यानामध्ये सूचना निवारण प्रणालीचे आमदार सुधीर दादा गाडगीळ यांचे हस्ते लोकार्पण !


| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. २६ जानेवारी २०२५

सांगली शहरातील महावीर उद्यान हे सांगलीकरांचे आवडते ठिकाण बनत आहे. शांत रम्य वातावरण, उद्यानातील प्रेक्षणीय ठिकाणे, उद्यानाबाहेर विविध प्रकारचे खाद्यपदार्थ, इत्यादीमुळे या ठिकाणी येणाऱ्या नागरिकांची गर्दी होत आहे.

नागरिकांना उद्यानाबाबत कोणतीही तक्रार, सूचना असल्यास 'क्यू आर' कोडद्वारे तक्रार दाखल करता येणार आहे. मनपा प्रशासन वतीने सर्व तक्रारींचे निराकरण करणार ---मा शुभम गुप्ता आयुक्त 

सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिका महावीर उद्यान ,सांगली येथे फिरायला येणाऱ्या नागरिकांना उद्यानाबाबत कोणतीही तक्रार, सूचना असल्यास क्यू आर कोड द्वारे तक्रार दाखल करता यावी ही सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहे,


या पोर्टलचे उद्घाटन सांगलीचे मा.आमदार सुधीर दादा गाडगीळ, यांच्या हस्ते मा, आयुक्त शुभम गुप्ता यांच्या प्रमुख उपस्थिती करण्यात आले आहे .

पोर्टल द्वारे तक्रारीचे व सूचनेचे निरसन करण्याची सोय देखील देण्यात आली आहे. नव्याने सेल्फी पाइंट देखील विकसित केले आहेत, नागरिकांनी जास्तीत जास्त या उद्यानाला भेट देऊन लाभ घेण्याचे आवाहन, उद्यान अधीक्षक गिरीश पाठक यांनी केले आहे.

 उद्घाटनाच्याप्रसंगी सहा आयुक्त नकुल जकाते, उद्यान अधीक्षक गिरीश पाठक, मक्तेदार रवींद्र गणपती केंपवडे, सहाय्यक आयुक्त सचिन सागावकर, माजी महापौर दिग्विजय सूर्यवंशी, माजी नगरसेविका गीतांजली ढोपे पाटील सामाजिक कार्यकर्ते डॉ.ज्ञानचंद्र पाटील, शिवसेनेचे नाना शिंदे, बसवराज पाटील तथा सियाराम टेलर इत्यादी कार्यक्रमास उपस्थित होते.