yuva MAharashtra जैन समाज देशाचा जीडीपी वाढवण्याचे काम करतोय - देवेंद्र फडणवीस

जैन समाज देशाचा जीडीपी वाढवण्याचे काम करतोय - देवेंद्र फडणवीस



| सांगली समाचार वृत्त |
पुणे - दि. १ डिसेंबर २०२
जैन समाज देशाच्या अर्थव्यवस्थेत मोठे योगदान देणारा समाज आहे. देशाच्या जीडीपी मध्ये सर्वात मोठा सहभाग हा जैन समाजाचा आहे, असे माजी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. भारतीय जैन संघटनेच्या पुण्यातील अधिवेशनात फडणवीस बोलत होते. तसेच सरकारी शाळांवर त्यांनी भाष्य केले आहे.

जैन समाजाचा कार्यक्रम हा केवळ समाजापुरता नाही, तर भारताच्या जीडीपीचा कार्यक्रम आहे. जीडीपी वाढण्याचा रस्ता जैन समाजातून जातो. जैन गुरूंनी समाजाला शिकवण दिली. जैन समाज जेवढे कमावतो तेवढे दान देखील करतो. जैन समाज केवळ जीडीपीमध्ये आपले योगदान देऊन थांबत नाही तर समाजातील वेगवेगळे सामाजिक कार्य करण्याचे काम जैन समाज करत असतो. असेही म्हणाले.


राज्यात जिल्हा परिषदा काय किंवा नगर परिषदा काय किंवा खासगी काय, या विविध विभागांच्या हजारो शाळा चालतात. अनेकदा पालकांचा ओढा हा कायम खासगी शाळांकडे जास्त असतो. सरकारी शाळांबाबत नकारात्मक चित्र रेखाटले जाते. पण महाराष्ट्र याला अपवाद असल्याची माहिती माजी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. देवेंद्र फडणवीस म्हणाले, सरकारी शाळेत शिक्षणात चांगले दिले जाते. सरकारी शाळेत शिक्षण खराब असते असे बोलले जाते पण महाराष्ट्र त्याला अपवाद ठरला. अनेक मुले आज सरकारी शाळेत शिकत आहेत.

शेतकऱ्यांची आत्महत्या थांबवायची असेल तर पाण्याचा प्रश्न सोडवावा लागेल हे लक्षात आलं आहे. महाराष्ट्रात ५० टक्के पेक्षा अधिक जमीन ही कोरडवाहू आहे. संविधानाची मूल्य समजली तरच आपली मुलं चांगली नागरीक बनू शकतात, असेही देवेंद्र फडणीस म्हणाले.