yuva MAharashtra कर्तृत्वाची व पुरस्काराची खाण हिंदकेसरी मारुती माने (भाऊ) !

कर्तृत्वाची व पुरस्काराची खाण हिंदकेसरी मारुती माने (भाऊ) !


| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. २७ डिसेंबर २०२
सांगली जिल्ह्यातील वारणानदी काठी वसलेले कवठेपिरान छोटेसे गाव या गावात एका सामान्य शेतकरी कुटुंबात जन्माला येऊन आपल्या कार्य कर्तृत्व दाखवून हिंदकेसरी, तसेच अशियायी क्रीडा स्पर्धेत भारताला एक सुवर्ण व रौप्य पदक मिळवून देणारे तसेच अनेक राष्ट्रीय व राज्य पुरस्कार मिळवणारे हिंदकेसरी मारुती माने (भाऊ) एक कर्तृत्ववान कुस्तीगीर म्हणून प्रसिद्ध आहेत.

हिंदकेसरी ही मानाची गदा १९६४ ला पंजाबमधील कर्नाल येथे झालेल्या स्पर्धेत जिंकून भारताचे चौथे व महाराष्ट्रातील तिसरे ठरले हिंदकेसरी गदा महाराष्ट्राला मिळवून देणारे मारुती माने भाऊ यांना त्यांच्या कुस्ती क्षेत्रातील कार्यबद्दल भारत सरकारने २००४ मध्ये मेजर ध्यानचंद जीवन गौरव पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. महाराष्ट्र शासनाने १९८२ शिवछत्रपती क्रीडा पुरस्काराने सन्मानित केले आहे. महाराष्ट्रातील विविध सामाजिक संस्थांनी मानाचे पुरस्कार भाऊंना दिले आहेत. हिंदकेसरी भाऊनी केलेल्या कुस्ती क्षेत्रातील कार्याची दखल हुज हू या जागतिक पातळीवर उत्तम क्रीडापटूची नोंद असणाऱ्या पुस्तकात त्यांची नोंद झाली आहे त्याच बरोबर दिल्ली येथील एका मार्गाला हिंदकेसरी मारुती माने पथ असे नाव देण्यात आले आहे. याच हिंदकेसरी भाऊंना महाराष्ट्र कुस्ती संमेलन राष्ट्रीय खलिफा पुरस्कार देऊन त्यांना मरणोत्तर सन्मानित करण्यात येणार आहे.


भाऊंनी आपल्या व्यक्तीमत्वाने समाजातील प्रत्येक घटकावर आपला ठसा उमटवला आहे. त्यांनी अखिल भारतीय कुस्ती महासंघाचे कार्याध्यक्ष, महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेचे अध्यक्ष शासकीय क्रीडा परिषद सदस्य विविध स्पर्धेचे निवड समिती सदस्य संयोजन समितीचे सदस्य म्हणून कार्य केले आहे धुळे, मुंबई, नाशिक, ठाणे, पुणे' महापौर केसरी कुस्ती स्पर्धेसाठी व महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा निरीक्षक म्हणून भाऊंना प्रत्येक स्पर्धेसाठी मैदानासाठी निमंत्रण असायचे. तिथे गेल्यानंतर भाऊंचे हजारो चाहते भाऊंच्या भोवती जमा व्हायचे.

एक आठवण हिंदकेसरी मारुती माने भाऊं यांनी कुस्ती बंद करून बरीच वर्षे झाली होती. सतपाल नावाचे वादळ भारतभर थैमान घालत होते. तेव्हा त्याने महाराष्ट्रातील पैलवानाना आव्हान दिले. भाऊ व जुने पैलवान मंडळी अकलूज येथे कुस्ती स्पर्धा संपवून सावर्डेकर तात्या यांच्या पाहुण्याकडे थांबले होते. त्यावेळी हरिचंद्र बिराजदार (मामा) त्यावेळचे उमदे पैलवान होते. तेव्हा भाऊंनी त्यांना सांगितले, "हे आव्हान स्विकारा, नाहीतर मला पुन्हा मैदानात उतरावे लागेल." 

बिराजदार मामांनी त्यावेळी ते आव्हान स्विकारले व सत्पालला चितपट केले. यासाठी भाऊंनी व जुन्या पैलवान मंडळीनी मामाची चांगली तयारी करुन घेतली व आपला स्वाभिमान राखला.

अशा भाऊंच्या कुस्ती व राजकीय क्षेत्रातील अनेक किस्से आज आपण कुतुहलाने ऐकतो. स्वर्गीय राजीव गांधी यांनी त्यांना स्वातंत्र सेनानी धुळाप्पाण्णा नवले यांच्यासाठी खासदारकी करिता शिफारस करण्यासाठी गेले असता, "आप क्यो नही होते खासदार ?" असे खुद्द राजीव गांधी यांनी सांगून, राज्य सभेवर खासदार निवड केली होती. 

सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष पाच वर्षे पश्चिम महाराष्ट्र बँक प्रथम क्रमांक, शेतकरी सहकारी साखर कारखाना उपाध्यक्ष, जिल्हा परिषद सदस्य, कवठेपिरान ग्रामपंचायत पंचवीस वर्षे सरपंच. असा त्यांच्या कार्याचा चढता आलेख होता.

तीच परंपरा आज भाऊंच्यानंतर त्यांचे पुतणे भिमराव माने आण्णा यांनी सुरु ठेवली आहे. आज पन्नास वर्षे गाव एकमुखी नेतृत्वाखाली सुरू आहे. भाऊंच्या कार्याला सलाम !