| सांगली समाचार वृत्त |
नवी दिल्ली - दि. १८ डिसेंबर २०२४
राज्यसभेत संविधानाच्या मुद्द्यावरून बोलताना केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी काँग्रेस सहविरोधकावर जोरदार घणाघात केला. आतापर्यंत काँग्रेसने सर्वाधिक वेळा संविधानात संशोधन करताना नागरिकांच्या मूलभूत अधिकारांचे हनन केल्याचे अमित शाह म्हणाले. मुस्लिम पर्सनल लॉ याचा उल्लेख करीत अमित शाह यांनी काँग्रेसला चांगलंच घेरलं. यावेळी अमित शाह यांनी युनिफॉर्म सिविल कोड म्हणजेच समान नागरी कायद्याबाबत मोठं विधान केलं आहे.
काँग्रेसने स्पष्ट करावं की संपूर्ण देशात एक कायदा असावा की नको, त्यांनी मुस्लिम पर्सनल लॉस सोबत हिंदू कोड बिल सुद्धा आणला. आम्हाला वाटतं की कायदे नवे हवेत. हिंदू कोड बिल मध्ये कोणताच अजून नाही. सामान्य कायद्यालाच त्यांनी हिंदू कोड बिल असं नाव दिलं. पर्सनल लॉ असावा असं मानलं, तर पूर्ण शरिया लागू करा असं सांगून अमित शाह म्हणाले की, लग्न आणि घटस्फोटासाठी पर्सनल लॉ लागू केला तेव्हापासूनच ध्रुवीकरणाची सुरुवात झाली. आम्ही उत्तराखंडमध्ये युसीसी आणण्याचा काम केलं. आमचं सरकार आता इतर राज्यातही युसीसी आणेल असेही अमित शाह यांनी राज्यसभेत ठणकावून सांगितलं.
देशाचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी संविधानात पहिल्यांदा सुधारणा केली याबाबत टीका करताना अमित शाह म्हणाले की, काँग्रेस पक्षाने तेव्हा मूलभूत अधिकाऱ्यांशी छेडछाड केली. काँग्रेस पक्षाने तेव्हा पहिल्यांदा मूलभूत अधिकाऱ्यांशी छेडछाड केली. . अभिव्यक्ती स्वातंत्र्य हिरावून घेतलं. काँग्रेसने जेव्हा जेव्हा संविधानात सुधारणा केल्या, तेव्हा तेव्हा सर्वसामान्य मूलभूत अधिकार हिरावून घेतले गेले. देशाच्या जनतेला हुकुमशहांचा गर्व आणि अभिमान नाहीसं करण्याचं काम लोकशाहीच्या माध्यमातून केलं असल्याचंही अमित शाह यांनी यावेळी सांगितले.
गेल्या 77 वर्षात सोळा वर्षे भाजपची देशात सत्ता होती यावेळी आम्ही 22 वेळा संविधानात संशोधन केलं. पण काँग्रेसने 75 वर्षात 77 वेळा संवेदन बदलल्याचं सांगून अमित शहा यांनी राज्यसभेत बोलताना आरोप केला की, काँग्रेसने कधी वोट बँकेचे राजकारण केलं तर कधी मूलभूत अधिकार नाकारण्यासाठी संविधान बदललं. यावेळी अमित शाह यांच्या विधानावरून काँग्रेसने बराच गदारोळ केला.