| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. १८ डिसेंबर २०२४
श्री. दिपकराव ढवळे यांची व्हाईस ऑफ मिडिया डिजीटल विंगच्या राज्य संघटक पदी, श्री. नित्यानंद कुंभार यांची व्हाईस ऑफ मिडिया डिजीटल विंगच्या सांगली जिल्हा अध्यक्षपदी तर श्री. जे. वाय. पाटील यांची ऑल रजिस्टर्ड न्यूज पेपर्स असोसिएशनच्या सांगली जिल्हा अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल मित्र मेळा ग्रुप, सांगलीच्या वतीने भव्य सत्कार करण्यात आला.
यावेळी ज्येष्ठ पत्रकार श्री. अशोकराव घोरपडे यांचा सत्कार मित्र मेळा ग्रुप सांगली चे अध्यक्ष श्री. हरी पाटणकर यांनी केला, श्री.दिपकराव ढवळे यांचा सत्कार श्री. कुमार सावंत, जिल्हा अध्यक्ष महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेना सांगली जिल्हा अध्यक्ष यांच्या शुभहस्ते करण्यात आला, तर श्री. नित्यानंद कुंभार यांचा सत्कार श्री.एस.एन.सपकाळ, अधिक्षक जिल्हा न्यायालय सांगली. यांच्या शुभहस्ते करण्यात आला. श्री.जे.वाय.पाटील यांचा सत्कार सहाय्यक पोलीस निरीक्षक ( निवृत्त) श्री. ए. बी. कांबळे यांच्या शुभहस्ते करण्यात आला.
यावेळी प्रिंट मिडिया इलेक्ट्रॉनिक्स मिडिया व सोशल मिडिया यांच्या मधील फरक या विषयावर ज्येष्ठ पत्रकार मा.श्री.अशोकराव घोरपडे यांनी उत्कृष्ट असे मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री. हरी पाटणकर, सूत्र संचालन श्री. अरुण वाघमोडे, आभार प्रदर्शन श्री.राजेंद्र घाडगे यांनी केले. सौ.व श्री.महादेव कबाडे, श्री. ए. बी. कांबळे, श्री. प्रसाद शुक्ल, श्री. सुधाकर कबाडगे, श्री.हरी पाटणकर, श्री.संदिप गोळे व सुनहरी यादें स्टुडिओ चे संचालक श्री.विनोद साळुंखे यांनी सुंदर गीते सादर करुन उपस्थितांची मने जिंकली.
कार्यक्रमासाठी श्री. अरविंद पतंगे यांनी विशेष सहाय्य केले. सौ. व श्री. दत्तात्रय कुलकर्णी, अध्यक्ष श्री गणेश ज्येष्ठ नागरिक संघ सांगली, ॲड. बाळासाहेब वाघमोडे यांच्यासह बहुसंख्येने नागरिक उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन श्री.हरी पाटणकर यांनी केले होते.