| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. २७ डिसेंबर २०२४
भारतीय जनता पक्षाच्या वतीने संपूर्ण देशभर सदस्यता नोंदणीचा कार्यक्रम सध्या चालू आहे. त्या अनुषंगाने आज सांगली येथे भारतीय जनता पार्टी, सांगली शहर जिल्ह्याच्या वतीने विश्रामबाग येथील खरे मंगल कार्यालयात सदस्यता नोंदणी अभियाना साठी सर्व प्रमुख कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांची बैठक संपन्न झाली.
या बैठकीला आमदार गोपीचंद पडळकर यांनी मार्गदर्शन केले. सर्व पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी येत्या 12 जानेवारीपर्यंत मोठ्या प्रमाणावर सदस्य नोंदणी करण्याचे आवाहन यावेळी त्यांनी केले. सर्व पदाधिकाऱ्यांनी सक्रिय सदस्य होऊन सदस्य नोंदणी करण्याबद्दल त्यांनी मार्गदर्शन केले.
सांगली शहर जिल्ह्यातून दोन लाख सदस्य करण्याचे उद्दिष्ट यावेळी ठरवण्यात आले. अभियानाच्या कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक जिल्हाध्यक्ष प्रकाश ढंग यांनी केले. सोशल मीडिया संयोजक संकेत कुलकर्णी यांनी सदस्यता नोंदणी संदर्भात, मोबाईल वरून कशा पद्धतीने सदस्य नोंदणी करायची आहे त्याबद्दल माहिती दिली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सरचिटणीस मोहन वाटवे यांनी केले. यावेळी आमदार सुरेश भाऊ खाडे आणि आमदार सुधीर दादा गाडगीळ यांनी सुद्धा कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. येणाऱ्या महापालिकेच्या व जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या दृष्टीने हे सदस्यता अभियान अत्यंत महत्त्वाचे आहे असे त्यांनी सांगितले.
यावेळी ग्रामीण जिल्हाध्यक्ष दीपक बाबा शिंदे यांनी संपूर्ण जिल्ह्यामध्ये सदस्यता अभियान पूर्ण ताकतीने राबवण्याबद्दल विश्वास व्यक्त केला. या बैठकीमध्ये नवनिर्वाचित आमदार सुरेश भाऊ खाडे, सुधीर दादा गाडगीळ, व गोपीचंद पडळकर यांचा कार्यकर्त्यांच्या वतीने सत्कार करण्यात आला.
सलग 20 वर्ष भारतीय जनता पक्ष सांगली जिल्ह्याचे प्रसिद्धी प्रमुख म्हणून काम केल्याबद्दल केदार खाडिलकर यांचा सत्कार आमदार गोपीचंद पडळकर यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी स्वातीताई शिंदे,संगीता खोत,श्रीकांत शिंदे, शिवाजी डोंगरे, काकासाहेब धामणे,सुबराव मद्रासी, भारतीताई दिगडे, अविनाश मोहिते, प्रदीप कांबळे, डॉक्टर भालचंद्र साठे, सोनाली सगरे, कल्पना कोळेकर राजू कुंभार सविता मदने सोनाली सगरे उर्मिला बेलवलकर माधुरी वसगडेकर, संजय यमगर यांच्यासह सर्व प्रमुख पदाधिकारी मंडळ अध्यक्ष, सर्व आघाड्यांचे अध्यक्ष व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.