| सांगली समाचार वृत्त |
नागपूर - दि. १६ डिसेंबर २०२४
आठवड्याभराच्या प्रतीक्षेनंतर महाराष्ट्र विधानसभा हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला अखेर महायुतीचा मंत्रिमंडळ विस्तार संपन्न झाला. यामध्ये 19 मंत्र्यांना शपथ दिली, तर शिवसेनेच्या 11 आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या 9 मंत्री पदाची शपथ घेतली. या मंत्रिमंडळाचे वैशिष्ट्य म्हणजे भाजपासह एकनाथ शिंदे व अजित दादा यांनी अनेक ज्येष्ठ दिग्गज नेत्यांना नारळ दिल्याचे दिसून आले. यापैकी काही चेहरे वादग्रस्त असल्याने त्यांचे गच्छंती पक्की होती. पण जे निष्ठावंत व स्वच्छ चारित्र्याचे मंत्री म्हणून कारकीर्द गाजविली, अशा मंत्र्यांनाही या मंत्रिमंडळात स्थान नाकारल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.
गतवेळाच्या मंत्रिमंडळातील अनेकांना डच्चू देत यंदा महायुती मधील तिन्ही पक्षांनी मिळून 25 नव्या चेहऱ्यांना पहिल्यांदाच संधी दिली आहे. तर सुधीर मुनगंटीवार, विजयकुमार गावित, रवींद्र चव्हाण, डॉ. सुरेशभाऊ खाडे, तानाजी सावंत, अब्दुल सत्तार, दीपक केसरकर, छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील, अनिल पाटील, संजय बनसोडे या नेत्यांचा पत्ता कट झाला आहे. यापैकी काही आमदारांनी राजीनामा दिला असून, काहींनी शपथविधी कार्यक्रमाला दांडी मारली होती. याची संपूर्ण राज्यात चर्चा सुरू आहे.
दरम्यान नागपूर येथील गुलाबी थंडीत विधान सभेतील वातावरण मात्र गरमच राहणार आहे. विरोधी पक्षाचे आमदार यंदा 50 पेक्षा त्यांचा आवाज विधानसभेत किती घुमणार ? सरकारला ते कसे घेरणार ? याबाबत सर्वत्र उत्सुकता असून, नेहमीच्या प्रथेप्रमाणे विरोधी पक्षाने सरकारने दिलेल्या चहा पाण्याची निमंत्रण नाकारून याचा ट्रेलर दाखवला आहे.
आज शपथ घेतलेले नवनिर्वाचित कॅबिनेट मंत्री
आ. चंद्रशेखर बावनकुळे - भाजपा
आ. राधाकृष्ण विखे पाटील - भाजपा
आ. हसन मुश्रीफ - राष्ट्रवादी
आ. चंद्रकांतदादा पाटील - भाजपा
आ. गिरीश महाजन - भाजपा
आ. गुलाबराव पाटील - शिवसेना
आ. गणेश नाईक - भाजपा
आ. दादा भुसे - शिवसेना
आ. संजय राठोड - शिवसेना
आ. धनंजय मुंडे - राष्ट्रवादी
आ. पंकजाताई मुंडे - भाजपा
आ. मंगलप्रसाद लोढा - भाजपा
आ. उदय सावंत - शिवसेना
आ. जयकुमार रावल - भाजपा
आ. अतुल सावे - भाजपा
आ. अशोक उईके - भाजपा
आ. शंभुराजे देसाई - शिवसेना
आ. आशिष शेलार - भाजपा
आ. दत्तात्रय भरणे - राष्ट्रवादी
आ. श्रीमती आदिती तटकरे - राष्ट्रवादी
आ. शिवेंद्रराजे भोसले - भाजपा
आ. ॲड. माणिकराव कोकाटे - राष्ट्रवादी
आ. जयकुमार गोरे - भाजपा
आ. नरहरी झिरवळ - राष्ट्रवादी
आ. संजय सावकारे - भाजपा
आ. जय शिरसाट - शिवसेना
आ. प्रताप सरनाईक - शिवसेना
आ. भारत गोगावले - शिवसेना
आ. मकरंद जाधव-पाटील - राष्ट्रवादी
आ. रितेश राणे - भाजपा
आ. आकाश फुंडकर - भाजपा
आ. बाबासाहेब पाटील - राष्ट्रवादी
आ. प्रकाश आबिटकर - भाजपा
आज शपथ घेतलेले नवनिर्वाचित राज्य मंत्री
आ. श्रीमती माधुरी मिसाळ - भाजपा
आ. आशिष जयस्वाल - शिवसेना
आ. पंकज भोईर - भाजपा
आ. श्रीमती मेघना बोर्डीकर - भाजपा
आ. इंद्रनील नाईक - राष्ट्रवादी
आ. योगेश कदम - शिवसेना