yuva MAharashtra मिरज हायस्कूल प्रांगणातील मधील पाळण्यासाठी दर निश्चित करा, मिरज सुधार समितीची आग्रही मागणी !

मिरज हायस्कूल प्रांगणातील मधील पाळण्यासाठी दर निश्चित करा, मिरज सुधार समितीची आग्रही मागणी !


| सांगली समाचार वृत्त |
मिरज - दि. ३१ डिसेंबर २०२
जानेवारी महिन्यात होणाऱ्या हजरत मिरासाहेब दर्गा उरूसासाठी महापालिकेच्या मिरज हायस्कूल मैदानाची जागा भाडेतत्वाने देताना निविदेमध्ये पारदर्शकता बरोबरच भाविकांना पाळण्यासह मनोरंजनाचे दर निर्धारित करण्याची तसेच, महिलांसाठी स्वतंत्र शौचालयाची व्यवस्था करण्याची मागणी मिरज सुधार समितीने महापालिकेकडे केली आहे.  

मंगळवारी मिरज सुधार समितीची अ‍ॅड. ए. ए. काझी, समन्वयक शंकर परदेशी, नरेश सातपुते, राकेश तामगावे, अफजल बुजरूक, संतोष जेडगे, राजेंद्र झेंडे, वसीम सय्यद, सलीम खतीब, अभिजीत दानेकर, श्रीकांत महाजन आदी सदस्यांनी अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसुळ यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, गत वर्षी मिरज हायस्कूलच्या मैदान जागा भाड्याने दिलेल्या निविदेत पारदर्शकता नसल्याने ठेकेदाराने याचा गैरफायदा मनोरंजन खेळाचे दर भरमसाठ लावून भाविकांची आर्थिक लुट केली होती.  


गत वर्षाचा अनुभव बघता जागा भाड्याने देण्याच्या निविदेत पादर्शकता आणून मोठ्या आकाराचे पाळण्यासह अन्य मनोरंजन खेळाचे प्रत्येक व्यक्ती दर ५०/- रूपये आणि लहान पाळण्यासह अन्य मनोरंजन खेळाचे प्रत्येक व्यक्ती दर ३० /- रुपये दर निविदेत नमुद करणे, भाविकांच्या सुरक्षितेसाठी विमासह अन्य उपाययोजना करण्याबरोबरच उरूसात येणाऱ्या महिला भाविकांसाठी जागोजागी स्वतंत्र फिरते शौचालय बसविण्याची मागणी मिरज सुधार समितीने केली आहे. यावेळी सहाय्यक आयुक्त अनिस मुल्ला, मिरज हायस्कूल मुख्याध्यापक राजेंद्र नागरगोजे उपस्थित होते.


गत वर्षी जागा ठेकेदाराने 9 लाख 40 हजार भाडे देऊन मनोरंजन खेळाचे भरमसाठ दर आकारले होते. यंदा दर निश्चित केल्यास ठेका कमी दरात जाण्याची शंका सहाय्यक आयुक्त अडसुळे आणि मिरज हायस्कूल मुख्याध्यापक राजेंद्र नागरगोजे यांनी व्यक्त केली असता, गत वर्षी पेक्षा 2 लाख 60 हजार अधिक म्हणजे 12 लाख रुपये भाडे देऊन निर्धारित दरात ठेका घेण्याची तयारी मिरज सुधार समितीने दाखविल्याने अधिकारी सुध्दा गप्प झाले.